शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

वऱ्हाडातील अल्प जलसाठा!

By admin | Published: May 24, 2017 2:20 AM

बाष्पीभवन वाढले; टंंचाईच्या झळा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील जलसाठ्यात वेगाने घसरण होत असून, बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणाऱ्या काटेपूर्णा धरणात २४ टक्केच जलसाठा आहे. उन्हाचा कडाकाही ४५ अंशांवर पोहोचला. पाण्याचे दररोज १४ ते १८ मि.मी. एवढे बाष्पीभवन होत आहे. यावर्षी पावसाळा समाधानकारक सांगण्यात येत असला, तरी वेळेवरील वाऱ्याचा वेग व परिस्थिती यावर पावसाचे आगमन अवलंबून असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे आता काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली असली, तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात २४.३७ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.३०, निर्गुणा १४.६९, उमा धरणात ४.७ टक्के तर दगडपारवा धरणातीलजलसाठा शून्य आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ५४.९६ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १०.१५ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात मृत जलसाठा आहे. पेणटाक ळी धरणात १.७२ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये २६.३७, मसमध्ये १३.३६ टक्के, कोराडी १०.२८, पलढग १८.५१, मन ३.७७, तोरणा २.२८ टक्के तर उतावळी धरणात १६.२७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १७.०३ टक्के, सोनलमध्ये २.७० तर एकबुर्जी प्रकल्पात २०.४० टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील उध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात ३७.८७ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४७.६८, चंद्रभागा ४७.९० टक्के, पूर्णा २०.१३ तर सपन या धरणात ४२.८५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ९.४२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.६०, बेंबळा धरणात २५.५३, लोअर पूसमध्ये २६.६०, सायखेडा १९.४६, गोकी १७.५६, वाघाडी १६.२६, बोरगाव ७.४१ टक्के, नवरगाव धरणात १४.२६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. टँकरची मागणी वाढली !अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील धरणातील जलसाठ्यात वेगाने घसरण होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोल्यात सध्या चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.विभागातील जलसाठा!विभागातील मोठ्या नऊ धरणांमध्ये आजमितीस २६.२८ टक्के जलसाठा असून, २३ मध्यम प्रकल्पात २२.४१ टक्के, तर ४८० लघू प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. एकूण सरासरी हा जलसाठा २१.०६ टक्के एवढा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात २४ टक्के जलसाठा आहे. सध्या ज्या पद्धतीने वितरण होत आहे, या पद्धतीनेच झाले तर हा जिवंत जलसाठा जून महिन्यापर्यंत पुरू शकतो. -विजय लोळे,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे मंडळ, अकोला.