मुंबई : थंडीने गारठलेली मुंबई आणि राज्य आता तापू लागले आहे. मुंबईसह राज्यातील शहरांच्या तापमानात वाढ होत आहे. विशेषत: मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, समुद्राहून वाहणारे वारे स्थिर होण्यास वेळ लागत असल्याने वातावरण तापत आहे. मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दरम्यान, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, १५ फेब्रुवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६.३, १९.६ अंश नोंदविण्यात आले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, १६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते आणि त्यापूर्वीही हे तापमान २४, १४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र, आता वातावरणातील बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे....त्यामुळे वारे होतात तप्तसमुद्राहून जमिनीकडे म्हणजे मुंबईकडे वाहणारे वारे सकाळी ११ वाजेपर्यंत स्थिर झाले, तर मुंबईचे वातावरण तापत नाही. म्हणजेच कमाल तापमान अधिक नोंदविण्यात येत नाही. मात्र, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब झाला म्हणजे दुपार झाली, तर हे वारे तप्त होतात. परिणामी, मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येते.दोन दिवस ‘ताप’दायकगुरुवारसह शुक्रवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. आकाश मुख्यत: निरभ्र राहील.राज्यातील शहरांचे किमान तापमानअलिबाग २०.६रत्नागिरी २१.४पणजी २२.८डहाणू २१.९पुणे १६.७जळगाव १७.४कोल्हापूर १९.३महाबळेश्वर १६.६मालेगाव २०.४नाशिक १६.४सातारा १७.४सोलापूर २०.१उस्मानाबाद १९औरंगाबाद १८.४परभणी १९.५बीड २१अकोला १९.२अमरावती १७बुलडाणा २१.६चंद्रपूर १५.४गोंदिया १४.३नागपूर १२वाशीम १९वर्धा १६.४यवतमाळ १८.४मुंबईतील ठिकठिकाणचे कमाल तापमानकुलाबा ३४.२वरळी ३२.९माझगाव ३२.६दादर ३१.७वांद्रे ३२.१सांताक्रुझ ३२.७अंधेरी ३३.७गोरगाव ३६.१मालाड ३३.९कांदिवली ३२.८चारकोप ३४.७आर्कुली ३५.१बोरीवली ३६विद्याविहार ३४घाटकोपर ३६.२पवई ३२.६जोगेश्वरी ३५.१भांडुप ३३.१मुलुंड ३३.३नेरुळ ३३.२पनवेल ३३.२(बुधवारचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये)
वातावरण तापतेय; विदर्भाला गारपिटीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:48 AM