पुणे : विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रम्हपुरी (४५.५) येथे झाली. तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर (१५.६) येथे नोंद झाले. काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ३५़६, लोहगाव ३६ , मालेगाव ३९.८, सांगली ३५.४ , सातारा ३४.६, सोलापूर ३८, मुंबई ३३.२, सांताक्रुझ ३३़५, अलिबाग ३५़९,रत्नागिरी ३२़५, पणजी ३३.६, औरंगाबाद ३८़, नांदेड ४१, अकोला ४२़, अमरावती ४२़८, बुलढाणा ३८़७, ब्रम्हपुरी ४५.५, चंद्रपूर ४५़, गोंदिया ४१़,नागपूर ४३़३, वाशिम ४०.२, यवतमाळ ४१़५़
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 4:32 AM