शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 5:17 AM

रायगड, पालघरमधून बोटी माघारी बोलावल्या : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज

अलिबाग/पालघर : रायगड, पालघर किनारपट्टी आणि दमणला बुधवारी, ३ जूनला असलेला चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रायगडच्या श्रीवर्धन- हरिहरेश्वर किनारपट्टीला हे वादळ आदळेल, असा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसह किनारपट्टी परिसरातील दुकाने, कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अरबी समुद्रात मंगळवारी चक्रीवादळ तयार होण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त करताच जिल्हा प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले. राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे-निंबाळकर यांनी किनारपट्टी भागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची सायंकाळी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.

चक्रीवादळाचा सामना करताना घ्यायची खबरदारी आणि उपाय योजना याबाबत चर्चा झाली. बैठक उशिरापर्यंत सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे व पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनीही उपाययोजनांची माहिती दिली. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोस्ट गार्ड, आयएमआरडी, राज्य आपत्कालीन यंत्रणेशी आपण सतत संपर्कात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले.

रेशनिंग दुकाने बंदकिनारपट्टी भागात ३ जूनला रेशनिंग दुकाने व किरकोळ केरोसिन परवानाधारकांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी अन्नधान्याचे वितरण होणार नाही.रायगडमध्ये हेल्पलाइन : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्कालीन प्रसंगी कोस्टल हेल्पलाइन क्र मांक १०९३ व पोलीस नियंत्रण कक्ष ७४४७७११११० वर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.ठाणे, पालघरच्या ५७७ बोटी अद्यापही समुद्रातमासेमारी बंदी कालावधी सुरू झालेला असतानाही पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ५७७ मच्छीमार बोटी समुद्रात असल्याने कोस्टगार्डमार्फत त्यांना माघारी आणण्याचे काम सुरू झाले आहे.तारापूरचे कारखाने उद्या बंदतारापूर एमआयडीसीसह सर्व औद्योगिक कारखाने बुधवारी बंद ठेवण्याबाबत टीमा संघटनेशी बोलणे झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबईत पावसाची हजेरीमुंबई : सोमवारी पहाटे मुंबई शहरासह उपनगरात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व सरींमुळे वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाला. चेंबूर, कुर्ला, सायन अंधेरी, दादरसह दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम मुंबई अशा बहुतांश सर्वच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाने नंतर विश्रांती घेतली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरावर दिवसभर ढग दाटून आले होते.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळcycloneचक्रीवादळ