शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

वाशिम - डॉक्टरच्या मानवतावादी विचाराने खुडल्या जाणा-या कळीला आधार

By admin | Published: September 02, 2016 2:17 PM

महिलेने तिस-यांदा एका कन्येला जन्म दिल्यानंतर त्या कन्येसाठी आधार शोधण्याचे मानवतावादी कार्य यवतमाळ जिल्ह्यातील शोभा सुराणा या स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञांनी केले.

दादाराव गायकवाड
ऑनलाइन लोकमत
वाशिम , दि. २ -  आधीच पोटी दोन मुली आणि घरची परिस्थिती बेताची अशा स्थितीत तिस-यांदा १२ वर्षानंतर गर्भधारणा झाली. दोन अपत्येच सांभाळणे कठीण असल्याने तिसरे अपत्य नको, म्हणून  गर्भपात करून घेण्यासाठी गेलेल्या महिलेस धीर देत गर्भ वाढविण्याची सूचना केली आणि त्या महिलेने एका कन्येला जन्म दिल्यानंतर त्या कन्येसाठी आधारही शोधण्याचे मानवतावादी कार्य यवतमाळ जिल्ह्यातील शोभा सुराणा या स्त्रीरोग आणि प्रसुतीतज्ज्ञांनी केले. कारंजा येथील निर्मल आणि मिना बरडिया या दाम्पत्याने त्या कन्येचा स्वीकार करून डॉ. सुराणा यांचा मानवतावादी कार्य तडीस नेण्यास मोठा हातभार लावला. 
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे डॉ. शोभा सुराणा या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत असतानाच डॉक्टर या नात्याने त्यांनी मानवतावादी विचारांची जपणूक नेहमीच केली आहे. एक दिवस त्यांच्याकडे वणी तालुक्यातीलच एक महिला आली. त्या महिलेला दोन मुली होत्या. लहान मुलगी १२ वर्षाची असताना तया महिलेला गर्भधारणा झाली. घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. केवळ चार एकर कोरडवाहू शेतीमध्ये राबराब राबून पिकलेल्या धान्यातून मिळेल त्या उत्पन्नाच्या आधारे कुटूंबाची गुजरान करायची, असे अशात दोन मुलींचा कसाबसा सांभाळ करतानाच तिसºयांदा गर्भधारणा झाल्यामुळे महिला आणि तिच्या पतीला मोठी चिंता पडली. त्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी हे दाम्पत्य डॉ. शोभा सुराणा यांच्याकडे गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गर्भ दोन महिन्याचा असल्याचे सांगितले; परंतु माझा व्यवसाय आणि धर्मही गर्भपात करण्यास परवानगी देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले; परंतु तसे त्या दाम्पत्यांना सांगतानाच त्यांनी त्या दोघांनाही गर्भपात न करण्याचा सल्ला दिला.  त्या गर्भाची चांगली सोय घेऊन तो वाढविण्याची सूचना केली आणि त्यासाठी त्यांना सहकार्यही केले, एवढेच नव्हे, तर सदर महिला प्रसतू झाल्यानंतर त्या बाळाला आधार कसा द्यायचा हा विचारही डॉ. सुराणा यांनी करून ठेवला होता. सदर महिलेची प्रसुती ६ आॅगस्ट रोजी झाली आणि तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. डॉ. सुराणा यांनी लगेचच ही माहिती त्यांच्या एका नातेवाईकामार्फत कारंजा येथील बरडिया दाम्पत्यापर्यंत पोहोचविली आणि कन्येला दत्तक घेण्याची तयारी आहे, की नाही त्याची शहानिशा केली. कारंजा येथील व्यापारी निर्मल बरडिया यांना मुलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी  पत्नीशी चर्चा करून त्याला संमती दर्शविली आणि सदर कन्येस मातापित्यांच्या हस्ते रितसर दत्तकविधान करून घरी आणले. सद्यस्थितीत ही कन्या २८ दिवसांची असून, मिना सुराणा या तिची आई या नात्याने उत्तम काळजी घेत आहेत. डॉ. शोभा सुराणा यांच्या मानवतावादी विचारामुळे एका खुडल्या जाणाºया कळीचे जीवन वाचलेच शिवाय तिला आधार म्हणून एक चांगले घरही मिळाले.