वाशिम : चुकीच्या पद्धतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्याने जंतूसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न करणार्या जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक व नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांना बुधवारी निलंबित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ऑक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरामध्ये २२पेक्षा जास्त रुग्णांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने आठ रुग्णांना डोळे गमवावे लागले. या गंभीर प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. काही रुग्णांना मुंबई येथील जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. चुकीच्या पद्धतीेने नेत्रशस्त्रक्रिया करणे व जंतूसंसर्ग झाल्यानंतरही योग्य उपचार न केल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मुंढे व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य खात्याचे उपसचिव रामचंद्र जाधव यांनी दिली.
वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्ररोगतज्ज्ञ निलंबित
By admin | Published: November 05, 2015 2:03 AM