- निशांत वानखेडेनागपूर : मानवाने केलेली अस्वच्छता केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर अंतराळातही कचऱ्याचे ढिगारे साठवून ठेवले आहेत. अर्थात हा कचरा अंतराळाचा शाेध घेण्याच्या माेहिमेमुळे झाला आहे. हा कचरा थाेडाथाेडका नाही तर लक्षावधी टनांचा आहे. सध्या पृथ्वीभाेवती दोन हजार सॅटेलाइट भ्रमण करीत आहेत. मात्र, निकामी झालेले तीन हजार मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान-माेठे लक्षावधी तुकडे केवळ पृथ्वीच्या कक्षेत विखुरले आहेत. हा कचरा नष्ट करणे हे जगभरातील अंतराळ संशाेधकांपुढचे आव्हान आहे.
किती आहे स्पेस जंक? १ मिलिमीटरपेक्षा माेठे स्पेस जंकचे १२८ दशलक्ष तुकडे पृथ्वीभाेवती पडले आहेत. २००९ ला एक व त्यानंतर मार्च २०२१ ला चीनचे सॅटेलाइट या कचऱ्याला धडकून नष्ट झाले हाेते. १९५९ मध्ये रशियाच्या ‘लुना-२’ पासून अमेरिकेचे रेंजर-४, जपानचे हिटन, युराेपचे स्मार्ट-१, भारताचे चांद्रयान-१, चीनचे चँग-१ व इस्रायलचे बेरशीट यान चंद्रावरच साेडण्यात आले हाेते. अमेरिकेच्या अपाेलाे १५, १६ व १७ यानात नेलेल्या तीन ‘मून बग्गी’ तेथेच आहेत. याशिवाय अंतराळवीरांनी ठेवलेले फाेटाेग्राफ, गाेल्फ बाॅल व इतरही साहित्य चंद्रावर असेल.
२००० सॅटेलाइटचे पृथ्वीभाेवती भ्रमण३००० मृत सॅटेलाइट पृथ्वीच्या कक्षेत पडले आहेत.३४,००० स्पेस जंकचे १० सेंटिमीटरपेक्षा माेठे तुकडे पडलेले आहेत.१,९०,००० किलाेग्रॅम साहित्य मानवाने चंद्रावर साेडले आहे.५४ मानवविरहित यान चंद्रावर उतरले किंवा क्रॅश झाले.
अनेक अंतराळ संशाेधक संस्थांनी मृत सॅटेलाइट जागेवर किंवा माेठे जाळे, चुंबक किंवा कुठल्या तरी शक्तीने पृथ्वीवर आणून नष्ट करण्याचे उपाय सुचविले आहेत. मात्र, ते केवळ माेठ्या उपग्रहापुरते मर्यादित आहेत. लक्षावधी लहान तुकडे नष्ट करणे हे आव्हान आहे. - महेंद्र वाघ, खगाेल शिक्षक, रमण विज्ञान केंद्र.