सुरेश काटे,तलासरी- तलासरी मधील कुख्यात अल्लारखा कुरेशी व समीर खान या गुंडाना डहाणू उपविभागीय अधिकाऱ्यांनी दोन वर्षा करीता तडीपार करण्यात आले असे असताना ते तलासरीत वावरत होते. या बाबत तलासरी पोलिसांना नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ते दापचरी तपासणी नाक्यावर आढळले. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या बाबत तलासरी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डहाणू उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्हयामुळे दोन वर्षां करीत पालघर, मुंबई, ठाणे तसेच लगतचे जिल्हे, गुजरात राज्यातील बलसाड जिल्हयांतून तडीपार केले असे असतांनाही ते तलासरीतच वावरत होते. तसेच दापचारी तपासणी नाक्यावरून अवैध रित्या अवजड वाहने पास करीत होते. याप्रकरणी नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. परंतु, पोलीस त्यांना पकडण्यास गेल्यावर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते पसार झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत सुद्धा संशय निर्माण झाला आहे. नागरिकांकडून तक्र ारी होऊ लागल्याने पोलीस या तडीपार गुंडांचा तपास करीत असताना ते तपासणी नाक्यावरील फूड हायवे हॉटेल मध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे गेले परंतु पोलिसाची चाहूल लागताच दोघेही रात्री अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या बाबत पोलीस शिपाई अनिल चव्हाण यांनी तक्र ार दाखल केली आहे. मात्र, या प्रकरणातून पोलीस यंत्रणेतील फोलपणाच पुढे आला आहे.>दापचारीनाक्यावर खुलेआम वास्तव्यतडीपार असताना दररोज ते दापचारी तपासणी नाक्यावर खुले आम उभे राहून गाड्या पास करायचे. तलासरीतील एस टी डेपो मध्ये हॉलि बॉल खेळणे, नाक्यावर पोलीस चौकी समोरच पुला खाली उभे राहणे या प्रकारामुळे सर्वसामान्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
तडीपार अल्लारख्खाचा तलासरीत वावर
By admin | Published: April 03, 2017 4:01 AM