लातूर : मिरजेहून रेल्वेने पाणी आणून लातूरच्या नागरिकांची तहान भागवली जात असतानाच शहरातील भांबरी चौकातील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची कॅप फुटल्याने शनिवारी लाखो लिटर पाणी वाया गेले. व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला तब्बल सात तास लागले.सकाळी ८ वाजता फुटलेला हा व्हॉल्व्ह दुपारी ३ वाजता दुरुस्त झाला़ पाण्याच्या नासाडीमुळे पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे. लातूरला रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली आहे. त्यातच शनिवारी पाईपलाईनवरील व्हॉल्व्ह सकाळी अचानक बिघडला़ पाण्याच्या दाबामुळे व्हॉल्व्हची कॅप फुटली़ त्यातून लाखो लिटर पाणी आजूबाजूच्या शेतात गेले़ (प्रतिनिधी)पाणी चोरण्यासाठी हा प्रकारव्हॉल्व्ह फुटण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला असून, त्यामागे कुणाची कुरघोडी असू शकते? पाणी चोरण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे पालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़ या संदर्भात पोलिसांत तक्रार करणार आहे.लोकांनी पालिकेला माहिती दिली; मात्र व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती झाली नाही. शुक्रवारी आर्वी जलशुद्धीकरण केंद्राजवळच्या एका व्हॉल्व्हला गळती लागली होती़
लातुरात लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: May 08, 2016 3:34 AM