शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

दुष्काळाच्या एसटीलाही झळा; २० दिवसांत ४३ कोटींचे उत्पन्न घटले

By admin | Published: May 23, 2016 4:29 AM

राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल

सुशांत मोरे, मुंबईराज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे एसटी महामंडळाला थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा दुष्काळाची झळ वाढली असून, मे महिन्याच्या २० दिवसांत ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले आहे. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. प्रवास टाळत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. मागील वर्षीच्या १ ते २0 मेपर्यंत भारमान हे जवळपास ६५ टक्के एवढे होते. या वर्षीच्या मे महिन्यातील याच दिवसांत भारमान ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तुलना केल्यास जवळपास सहा टक्क्यांनी भारमान घसरले असून, त्यामुळे महामंडळाला मे महिन्यात ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

मराठवाडा विभागात औरंगाबाद क्षेत्रातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी विदर्भात नागपूर क्षेत्रातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा तर खान्देशात नाशिक क्षेत्रातील जळगाव, अहमदनगर, धुळे, नाशिकमध्ये दुष्काळाचा एसटीवर सर्वांत जास्त परिणाम झाला आहे. एप्रिलनंतर दिलासा नाहीच : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत दुष्काळामुळे एसटीला ३१ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले होते. एप्रिल महिन्यात लग्नसराई असल्याने भारमान थोडेफार वाढले होते. मात्र मे महिना सुरू होताच भारमान हळूहळू घसरू लागले. वाढते तापमानही कारणीभूत : दुष्काळाबरोबरच राज्यातील काही भागांत तापमानात मोठ्या प्रमाणात वाढही झाली आहे.

त्यामुळे अनेक जण प्रवास टाळत असून, त्याचा थेट परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होत असल्याचे सांगण्यात आले. 1मुंबई क्षेत्रातील (मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, ठाणे)४.६५ टक्क्यांनी, पुणे क्षेत्रात(कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर) भारमान ५ टक्क्यांनी आणि अमरावती क्षेत्रातील (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ) भारमान ५.८१ टक्क्यांनी घसरले आहे. 2मराठवाड्यात मे महिन्यातील याच दिवसांत तुलनेने भारमान जास्त असते. मागील वर्षीच्या मे महिन्यात मराठवाड्यात ६९ टक्के असणारे भारमान यंदाच्या मे महिन्यात तब्बल आठ टक्क्यांनी घसरले आहे. तर विदर्भात जवळपास ६ टक्क्यांपर्यंत भारमान घसरले

असून, खान्देशात हेच प्रमाण सात टक्क्यांपर्यंत आहे3राज्यात दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.