शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वॉचमनने भिंतीला होल पाडून सोने व रोख रक्कम केली लंपास

By admin | Published: December 26, 2016 8:19 PM

शहरातील लालचक्की परिसरात प्रसिद्ध मनप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे.

ऑनलाइन लोकमत/सदानंद नाईकउल्हासनगर, दि. 26 - शहरातील लालचक्की परिसरात प्रसिद्ध मनप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. इमारतीच्या वॉचमनने मध्यरात्री मणप्पुरम गोल्ड कार्यालयाच्या भिंतीला होल पाडून कटर व इतर साहित्याने लॉकरमधील रोख रक्कम व सोने लंपास केले आहे. सकाळी प्लॉटधारकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला माहिती दिल्यावर तपासाची चक्रे फिरली. वॉचमन फरार झाला असून अंदाजे ३० किलो सोन्यासह रोख रक्कम लंपास झाल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर कॅम्प नं-४ लालचक्की परिसरातील सार्वजनिक हॉलजवळ शंकर कृपा पॅलेस इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर मणप्पुरम गोल्ड कंपनीचे कार्यालय असून, येथे सोने गहाण ठेवल्यानंतर व्याजावर कर्ज दिले जाते. इमारतीचा वॉचमन करण थापा याने प्लॉटधारकांना विश्वासात न घेता, गावी जाण्यापूर्वी एका अनोळखी नेपाळी इसमाला वॉचमन म्हणून ठेवले होते. तोच काही दिवसापासून इमारतीचा वॉचमन असून इमारतीची साफसफाई व पाणी सोडत होता. सकाळी वॉचमनने पाणी सोडले नाही. म्हणून प्लॉटधारकांनी वॉचमनला हाका दिल्या. मात्र एकही प्रतिसाद न मिळाल्याने इमारतीच्या पाय-या खालील वॉचमन रूममध्ये त्यांनी शोधले असता त्यांना धक्कादायक चित्र दिसले. वॉचमनची रूम सताड उघडी असून, मणप्पुरम गोल्ड कार्यालयाच्या भिंतीला गोल आकाराचे छिद्र पाडले होते. प्लॉटधारक या प्रकाराने घाबरून त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना झालेल्या प्रकाराचे माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिरसाट यांनी पथकासह पाहणी केली असता इमारतीच्या नवीन वॉचमनने, वॉचमन रूममधून मध्यरात्री कार्यालयाच्या भिंतीला छिद्र पाडले. त्यावाटे कार्यालयात प्रवेश करून गॅस कटरच्या मदतीने लॉकर तोडून रोख रक्कमेसह अंदाजे ३० किलो सोने लंपास केले. मात्र विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून रोख रकमेसह सोने चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.इमारतीच्या वॉचमनचे कृत्य पोलीस उपायुक्त नितीन भारद्वाज यांनी घटनास्थळाची पाहणी केली. इमारतीच्या जुन्या करण थापा नावाच्या वॉचमनसह नवीन ठेवलेल्या वॉचमनचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस वॉचमनच्या मागावर असून लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन भारद्वाज यांनी दिली आहे. शंकर कृपा पॅलेस इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती सकाळी दिली. मात्र पोलीस १ तास उशिराने आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. घटना सकाळी होऊनही तपासाला १२ वाजल्याचे बोलले जाते. तर योग्य दिशेने पोलीस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिरसाट यांनी दिली आहे.

- या दरोड्यात ज्या ग्राहकांचं सोनं चोरी झालं आहे. त्यांना पूर्णतः नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. चोरीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. अत्याधुनिक मध्यवर्ती देखरेख सुरक्षा प्रणालीअंतर्गत ग्राहकांचं सोनं सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे. पोलीस चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करतील, असंही मन्नपूरम फायनान्स कंपनीनं म्हटलं आहे.