शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पहारेकरी झोपले!, प्रकाश मेहता प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 7:52 AM

एका विकासकाला सवलत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय, असा शेरा लिहिल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता अडचणीत सापडले आहेत.  प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. या प्रकरणामुळे मित्रपक्ष शिवसेनेला भाजपावर टीकास्त्र सोडण्यासाठी आयते कोलीत हातात मिळाले आहे. 

मुंबई,दि. 3 - एका विकासकाला सवलत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेय, असा शेरा लिहिल्याने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता अडचणीत सापडले आहेत.  प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढत चालला आहे. या प्रकरणामुळे मित्रपक्ष शिवसेनेला भाजपावर टीकास्त्र सोडण्यासाठी आयते कोलीत हातात मिळाले आहे. 

यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपावर बोचरी टीका केली आहे. ''मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे मोजण्याचे काम ज्या पहारेकऱयांनी अंगावर घेतले आहे ते पहारेकरी राज्य सरकारातील त्यांच्याच मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत झोपले आहेत. पहारेकरी झोपले असल्याने मंत्र्यांनी चो-या सुरू केल्या आहेत की चोर घरातलेच असल्याने पहारेक-यांनी डोळय़ांवर कातडे ओढले आहे?'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे.  

''सरकारच्या भ्रष्टाचार तोलण्याच्या तागड्या वेगळ्या आहेत काय, हा पहिला प्रश्न आणि शिवसेनेवर नेमलेले पहारेकरी मेहता व मोपलवार प्रकरणात झोपेचे सोंग घेऊन वावरत आहेत काय, हा दुसरा प्रश्न. शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असे प्रचंड आत्मविश्वासाने का बोलले जाते, या प्रश्नाचे ‘गुपित’ मेहता-राधेश्यामांच्या प्रकरणाने महाराष्ट्राला अवगत झाले आहे.'', असे प्रश्न उपस्थित करत उद्धव यांनी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये ?

भारतीय जनता पक्षाच्या ‘पारदर्शक’ वगैरे कारभाराचा सध्या भलताच फज्जा उडालेला आहे. मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे मोजण्याचे काम ज्या पहारेकऱयांनी अंगावर घेतले आहे ते पहारेकरी राज्य सरकारातील त्यांच्याच मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत झोपले आहेत. पहारेकरी झोपले असल्याने मंत्र्यांनी चोऱया सुरू केल्या आहेत की चोर घरातलेच असल्याने पहारेकऱयांनी डोळय़ांवर कातडे ओढले आहे? त्याचा खुलासा पहारेकरी महामंडळाचे प्रमुख असलेल्यांनी करायला हवा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी केलेल्या अनेक बेकायदा कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे. एम. पी. मिल कंपाऊंड पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरला फायदा मिळवून देणारा निर्णय सन्माननीय मंत्रीमहोदयांनी घेतला. पुन्हा संबंधित भ्रष्ट फायलीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने शेरा मारून ही भ्रष्टाचाराची फाईल पुढे रेटण्याचा प्रतापदेखील केला. त्यामुळे आता खुद्द मुख्यमंत्र्यांवर शिंतोडे उडाले आहेत. संबंधित भ्रष्ट निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीने घेतल्याचा शेरा त्यांचेच एक मंत्री मारतात. या सर्व घोटाळ्यात पाचशे कोटींचा ‘चुना’ लावला जातो व या सर्व प्रकरणातून मुख्यमंत्री आपले हात झटकून मोकळे होतात, ही बाब गंभीर आहे. पारदर्शी कारभाराचे वाभाडे काढणारे व मुख्यमंत्र्यांना बदनामीच्या खड्ड्यात ढकलणारे हे प्रकरण आहे. प्रकाश मेहता हे गृहनिर्माण खात्याचे मंत्री आहेत व ‘म्हाडा’च्या अनेक

भूखंडांचे संशयास्पद व्यवहारझाल्याचे आता समोर आले आहे. एसआरए प्रकल्पातील एका बड्या अधिका-याने निवृत्तीच्या आदल्या दिवशी ‘गतिमान’ कारभार करून पाचशे-सहाशे प्रकल्पांच्या फायलींना मंजुरी दिली. ते प्रकाश मेहतांना अवगत होते काय? मंत्र्यांच्या इशा-याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात त्या फायलींचा निचरा होऊच शकत नाही. भोसरीच्या भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना घरी जावे लागले व त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी झोटिंग समिती नेमली. खडसे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला आव्हान देत असल्याने त्यांचा काटा काढला या अफवांवर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभाराची भूमिका मांडली आहे व भ्रष्टाचार सहन करणार नसल्याचे ते रोज ठणकावून सांगत आहेत, पण मुख्यमंत्र्यांना अवगत करून भ्रष्टाचार करणारे मेहता इतके होऊनही मंत्रिमंडळात कसे, हा प्रश्न आहे. खडसे गेले, पण मेहतांना मात्र कवचकुंडले! हा दुटप्पीपणा आहे. मंत्री आणि अधिकाऱयांनी ठरवून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले एक अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची ‘पारदर्शक’ ध्वनिफीत कारभाराची ‘वाट’ दाखवत आहे. मंत्रालयात कुणाला तरी दहा कोटी रुपये देण्याविषयी हे मोपलवार बोलत आहेत. राज्याच्या रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले राधेश्याम ही साधी असामी नाही. मुख्यमंत्र्यांना ‘हव्याच’ असलेल्या

‘समृद्धी’ महामार्गाची संपूर्ण जबाबदारीया राधेश्यामांच्या खांद्यावर आहे व जोरजबरदस्तीने शेतकऱयांच्या जमिनी ताब्यात घेण्यात हे साहेब आघाडीवर आहेत. त्यामुळे मंत्रालयात दहा कोटी पोहोचवण्याचा ‘पारदर्शक’ कारभार करणारे मोपलवार नक्की कुणासाठी हा व्यवहार करीत होते व आतापर्यंत त्यांनी अशा किती खेपा पोहोचवल्या, त्याचा तपास मुख्यमंत्र्यांनी करायलाच हवा. आता या मोपलवारांना मुख्यमंत्र्यांनी पदच्युत केले ते ठीक आहे, पण भविष्यात आणखी ‘मोपलवार’ निर्माण होणार नाहीत याची काळजीही त्यांनी घ्यायला हवी. कारण मेहतांसारखे जे मंत्री आहेत त्यांच्या हाताखाली अनेक ‘मोपलवार’ काम करीत आहेत. शेवटी नितीशकुमारांप्रमाणे फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेचा हा प्रश्न आहे. तिकडे कर्नाटकात गुजरातचे आमदार एका रिसॉर्टवर मजा मारत आहेत. त्या रिसॉर्टचा मालक असलेल्या कर्नाटकी मंत्र्याच्या कार्यालयांवर धाडी घालून 10 कोटी जप्त केल्याचे लगेच जाहीर होते. मात्र इकडे महाराष्ट्रात मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर फक्त ‘चौकशी’ची घोषणा होते. सरकारच्या भ्रष्टाचार तोलण्याच्या तागडय़ा वेगळय़ा आहेत काय, हा पहिला प्रश्न आणि शिवसेनेवर नेमलेले पहारेकरी मेहता व मोपलवार प्रकरणात झोपेचे सोंग घेऊन वावरत आहेत काय, हा दुसरा प्रश्न. शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असे प्रचंड आत्मविश्वासाने का बोलले जाते, या प्रश्नाचे ‘गुपित’ मेहता-राधेश्यामांच्या प्रकरणाने महाराष्ट्राला अवगत झाले आहे.