पुणो : शहरात पाणीपुरवठा करणा:या खासगी टँकरला ग्लोबल पोङिाशनिंग सिस्टीम (जीपीएस) यंत्रणा बसविण्यासाठी ठेकेदारांनी नकार दिल्याने सर्व खासगी टँकरला महापालिकेकडून देण्यात येणारे पाण्याचे पास आजपासून बंद करण्यात आले. ही यंत्रणा बसविण्यासाठी पालिकेने या टँकरधारकांना 21 जुलैर्पयतची मुदत दिली होती. शहरात दररोज सुमारे 25क् ते 3क्क् टँकरचे पास पालिकेकडून दिले जातात.
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर शहरातील बांधकामे, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटरलाही पालिकेने बंदी घातलेली आहे. असे असतानाच, नागरिकांच्या मागणीनुसार, शहरात खासगी टँकरद्वारे केल्या जाणा:या पाणीपुरवठय़ावर पालिकेचे काहीच नियंत्रण नाही. पालिकेकडून अल्पदरात पिण्याचे पाणी घेऊन हे पाणी हद्दीजवळील बांधकामे
तसेच गावांमध्ये मनमानी दराने विकले जात आहे.
या प्रकारास आळा घालण्यासाठी महापालिकेने या टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही यंत्रणा महाग असल्याचे सांगत तसेच ती बसविण्यासाठी पालिकेनेच मदत करावी, अशी भूमिका या टँकरमालकांनी घेतली. तसेच मंगळवारपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, ही यंत्रणा बसविण्यासाठी दिलेली मुदत आजच संपत असल्याने पालिकेने आज सकाळपासूनच या टँकरला पास
देणो बंद केले असल्याची
माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.(प्रतिनिधी)
टँकर लॉबीसाठी राजकीय दबाव
महापालिकेने टँकरला जीपीएस यंत्रणा बसविण्याची सक्ती केल्यानंतर टँकरधारकांची पाणीचोरी उघड होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नकार दिला जात असून, आपली बाजू मांडण्यासाठी राजकीय नेत्यांचा आधार घेतला जात आहे. नगरसेवक तसेच पालिकेच्या पदाधिका:यांना भेटून या टँकर लॉबीकडून प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी अधिका:यांवर दबाव आणला जात असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महापालिकेत
आज बैठक
महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर टँकरचालकांनी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, जीपीएस यंत्रणा बसविण्यास विरोध करीत टँकरचालकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रशासनावर दबाव आणला आहे. त्याविषयी महापालिका प्रशासन व टँकरचालकांची उद्या (मंगळवारी) बैठक होणार आहे.