पुणे : शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये सौर ऊर्जेद्वारे पाणी खळाळणार असून, त्यासाठी त्यांना आता एकही पैसा वीजबिलापोटी द्यावा लागणार नाही. जिल्ह्यातील २९५ कृषिपंप कार्यान्वित झाले असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी दिली. महावितरणच्या मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभागामधील मुळशी, वेल्हे, मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यातील ८०६ शेतकरी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ७५४ शेतकऱ्यांना योजनेचे कोटेशन दिले होते. त्यातील ४८४ शेतकऱ्यांनी आपल्या वाट्याची रक्कम भरली. त्यानुसार महावितरणकडून संबंधित एजन्सीला काम करण्याचे कंत्राट दिले. आतापर्यंत तीन एचपी क्षमतेचे २४३ आणि पाच एचपी क्षमतेचे ५२ असे २९५ सौर कृषिपंप चालू केले आहेत. तर, सद्य:स्थितीत ५५ सौर पंप कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे.कृषिपंपांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्ही अथवा १०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात येते. त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. वीजचोरी, तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी येतात. दुर्गम व डोंगराळ भागात वीज यंत्रणेचे जाळे नसल्याने या ठिकाणी डिझेलचा वापर करून कृषिपंप चालवले जातात. या अडचणीतून मुक्तता मिळावी यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा कृषी पंप योजना हाती घेतली आहे. कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही अथवा वीजजोडणी प्रस्ताव प्रलंबित असलेल्या शेतकºयांना या योजनेत सहभागी होता येते. सोलर पॅनेल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे व इतर आवश्यक साहित्यासाठी ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाते.--सौर कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदानसौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे, तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. या यंत्रणेला बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. तीन किंवा पाच एचपी क्षमतेच्या सौर प्रकल्पाची किंमत २.२५ ते २.५० लाख असून, खुल्या वर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के आणि इतर प्रवर्गांसाठी ९५ टक्के अनुदान दिले जाते. या वर्षी २५ हजार सौर कृषिपंप वितरीत केले आहेत.
पुणे जिल्ह्यात सौर ऊर्जेवर येणार शिवारात पाणी ; जिल्ह्यात २९५ पंप कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:00 PM
वीज बिल होणार बंद
ठळक मुद्देसौर कृषिपंपासाठी ९५ टक्के अनुदानसौर कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे, तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधीवीजचोरी, तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अडचणी