संतोष वानखडे/वाशिम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यात विविध प्रकारच्या ८८११ जलसंधारणाची बांधकामे करण्यात आली आहेत. जलपातळीतील घट उंचाविण्याबरोबरच जलपातळी समान ठेवणे, या दृष्टिकोनातून शासनाने विविध उपक्रम व योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचाच एक भाग असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. साधारणत: पावसाळा सुरू होण्यापूर्वी पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजनांद्वारे पाण्याचे संधारण करणे, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, छतावरील पाण्याची साठवणूक, पावसाचे पाणी साठवण्यासाठी डोंगराळ भागात तलाव बांधणे आदी कामे हाती घेतली जातात. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा एक मुख्य घटक असलेल्या शिवकालीन पाणी साठवण उपयोजनेतून राज्यातील ग्रामीण भागात पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी फेब्रुवारी २0१४ पर्यंत ८८११ बांधकामे करण्यात आली आहेत. यामध्ये सर्वाधिक तीन हजार ७३ बांधकामे औरंगाबाद विभागात, त्याखालोखाल नागपूर विभागात १८८३, अमरावती विभागात १७२0, कोकण ९६५, पूणे ९१३ आणि सर्वात कमी २५७ बांधकामे नाशिक विभागात करण्यात आल्याची नोंद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या दफ्तरी आहे. फेब्रुवारी २0१४ पर्यंत राज्यातील १२ हजार १0४ वस्त्यांची निवड विविध प्रकारच्या जलसंधारणाच्या उपाययोजनांसाठी करण्यात आली होती. या वस्त्यांमध्ये ३१ हजार ६१0 उपाययोजना निश्चित केल्या होत्या. त्यापैकी १0 हजार ४१0 वस्त्यांमधील २८ हजार १२ उपाययोजना पूर्णत्वाकडे गेल्या असून त्यावर ४२१ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे.
शिवकालीन पाणी साठवणुकीतून ‘जलसंधारण’
By admin | Published: October 01, 2014 1:30 AM