शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लोकसहभागातून जलसमृद्धी

By admin | Published: October 08, 2016 1:59 AM

पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेबरोबरच तलावामधील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेस अनन्य साधारण यश प्राप्त झाले आहे. गावोगावच्या लोकांच्या श्रमदान मोहिमेतून १५ तालुक्यांतील एकूण ३२ विविध ठिकाणच्या नदी-तळी-तलावांमधील तब्बल ५ लाख २ हजार ७७४ घनमीटर गाळ उपसून काढून हे जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. या सर्व गाळ उपसण्यामुळे तब्बल ५०२ टीसीएम अशी विक्रमी जलसाठवण क्षमता वृद्धिंगत करुन दाखवण्याची किमया गावोगावच्या ग्रामस्थांनी करुन दाखविली आहे.रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेबरोबरच जिल्ह्यात असलेल्या तलाव, धरणातील गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा विचार करता थोडेसे अवघड वाटणारे काम रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वाखालील महसूल यंत्रणेने केलेले सुयोग्य नियोजन आणि सामाजिक संस्था व नागरिक यांचा स्वेच्छा सक्रिय सहभाग यामुळे यशस्वी झालेपिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, सिमेंट बंधारे, माती बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव यासारख्या अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची जलसाठवण क्षमता पुन:र्स्थापित करणे, जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंधाबाबत जनतेत जाणीव व जागृती निर्माण करणे, गाळ काढण्याचा मोहिमेची उद्दिष्टे सांगून जनसामान्याचा सहभाग वाढवणे असा उद्देश या मोहिमेमागे होता. प्रत्येक तालुक्यामधील तहसीलदार तसेच महसूल यंत्रणा यांनी आपल्या परिसरातील तलाव, धरण यांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर गाळ काढण्यासाठी तलाव व धरणाची निवड केली. लोकांमध्ये याबाबत जागृती करून त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लोकसहभागातून काम करण्यात आले.>गावातील भूजलात वाढजलसाठ्यांची क्षमता वृद्धीकरण झाल्यामुळे गाव क्षेत्रातील भूजलात वाढ झाली आहे. गाळ काढून तो शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असून मृदसंधारणात वाढ झाली आहे. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करणे शक्य झाले आहे.