नीरा-नृसिंहपूर : विहिरींची पाण्याची पातळी खलावली असल्याने इंदापूर तालुक्यात गिरवी, लुमेवाडी, सराटी, भगतवाडी, निरनिमगाव, पिटेवाडी, चाकाटी, खोरुची या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच उभी पिके पाण्याअभावी जळू लागली असून जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.नीरा नदी डिसेंबरमध्येच कोरडी पडल्याने नीरा नदीवरील सर्व बंधारे कोरडे झाले असून त्यामुळे शेतीतील पिके जळाली काही शेतकऱ्यांनी हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी पैसे मोजून पाण्याचे टँकर विकत घेतले व गावोगावी पाणीपुरवठा योजनेत पाणीच नसल्यामुळे योजना बंद पडल्या आहेत. (वार्ताहर)>टँकर सुरु कारावेतमहिला व लहान मुलांना दोन-दोन किलोमीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या परिसरात प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत. तसेच जनावराच्या चाऱ्यासाठी छावण्या चालू कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच इंदापूर तालुक्यात पाणी टंचाई मुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीरतेने भेडसत असल्याने नीरा डावा कालवा, खडक वासला, कालव्यातून पाणी सोडून नीरा नदीवरील बंधारे भरण्याची मागणी परिसरातील शतकारी वर्गातून केली जात आहे.
विहिरींची पाणीपातळी खालावली
By admin | Published: April 04, 2017 1:32 AM