शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

पाण्याला ऐवजाचे मोल!

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

चोरी होऊ नये, म्हणून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवतात. तशीच काहीशी स्थिती लातूर शहरातील पाण्याची आहे. तीव्र टंचाईतही ज्यांना टाक्या पाण्याने भरून

- हणमंत गायकवाड,  लातूरचोरी होऊ नये, म्हणून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवतात. तशीच काहीशी स्थिती लातूर शहरातील पाण्याची आहे. तीव्र टंचाईतही ज्यांना टाक्या पाण्याने भरून ठेवता आल्या आहेत, त्यांनी हा ऐवज कुलूपबंद करून सुरक्षित ठेवला आहे. गल्ल्या-गल्ल्यांमधून अशा कुलूपबंद पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा होत असताना, दीडशे रुपये प्रति महिना पाणीपट्टी आकारली जात होती. आता दिवसाला एका कुटुंबाला पाण्यावर इतका खर्च करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. शिवाय, विकत घेऊन साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलपे लावली आहेत.शहरातील बसवंतपूर, प्रकाशनगर, खाडगाव रोड, संभाजीनगर, गांधीनगर, बौद्धनगर, संत गोरोबा सोसायटी, सिद्धार्थ सोसायटी, क्वाइल नगर, विक्रमनगर, नृसिंहनगर, आवंतीनगर, कपिलनगर, विकासनगर या वसाहतींतून फिरताना कुलूपबंद टाक्या पाहायला मिळतात.गांधीनगर येथील धनराज शिंदे यांनी सांगितले की, ‘मनपाकडून आठ-दहा दिवसाला दोनशे लीटर्स पाणी दिले जाते, परंतु एवढ्यावर भागत नाही. त्यामुळे आम्ही पाणी विकत घेतो. त्यातच विकतच्या पाण्याचीच चोरी झाली. मध्यरात्री, तसेच दुपारच्या वेळी पाणी चोरीला गेले. त्यामुळे आम्ही टाकीला कुलूप लावतो.’ टँकरधारकांकडे पाण्याची मागणी वाढली आहे, त्यामुळे दरही वाढले आहेत. ज्या संस्था-संघटनांकडून पाणी मोफत दिले जाते, ते त्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांनाच मिळते. सामान्य व मध्यमवर्गीयांना त्याचा लाभ होत नाही. परिणामी, आम्ही पाणी विकत घेऊन कुलूपबंद ठेवतो, असे कपिलनगर येथील सतीश कांबळे यांनी सांगितले. टाक्यांना कुलूप...पाण्याच्या खर्चामूळे नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. शिवाय, विकत घेऊन साठवून ठेवलेल्या पाण्याची चोरी झाल्याचे प्रकारही वाढले आहेत. याची खबरदारी म्हणून लातूर शहरातील सिद्धार्थ सोसायटी, बौद्धनगर, संत गोरोबाकाका सोसायटी, क्वाइलनगर, गांधीनगर येथील अनेकांनी पाणी भरलेल्या आपल्या सिन्टेक्सच्या टाक्यांना कुलूप लावले आहे.चोरी होऊ नये म्हणून घेतली खबरदारी...बसवंतपूर येथील जमाल पठाण, सिद्धार्थ सोसायटीतील नीलूबाई सावळे, बौद्ध नगरातील केरबा सूर्यवंशी, संत गोरोबाकाका सोसायटीतील श्रीकांत शिंदे, विनायक कसबे, योगेंद्र कांबळे, क्वाइलनगर येथील सतीश सरवदे, आनंद कांबळे आदींनी आपल्या पाण्याच्या टाकीला कुलूप लावले आहे. घरातल्याही लोकांकडून पाण्याचा गैरवापर होऊ नये अन् चोरीही होऊ नये, यासाठी कुलूप लावल्याचे त्यांनी सांगितले. वापरासाठी आणि पिण्यासाठी वेगळे... विकतचे पाणी पिण्यासाठी शुद्ध असेल याची खात्री नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक पिण्यासाठी जारच्या पाण्याचा वापर करतात, तर वापरण्यासाठी टँकरचे पाणी विकत घेतात. दिवसाला किमान दीडशे रुपये या पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाण्याचे महत्त्व कळले असून, वापर काटकसरीने सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी साठविलेले पाणी देखरेखीखाली ठेवले आहे.