शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

By admin | Published: May 16, 2016 4:37 AM

पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे.

मनोहर कुंभेजकर,  

मुंबई-राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही मच्छीमारांची मोठी समस्या बनली आहे. यावर मात करत वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे ४५० सभासदांनी एकमताने निर्णय घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी वेसावकरांना आधारवड ठरणारा आणि राज्यातील समुद्रकिनारी असलेला पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. रोज २४ तास हा जलशुद्धप्रकल्प सुरू असतो आणि येथील मच्छीमार बांधवांनादेखील यामुळे रोजगार मिळाला आहे. येथील मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. या प्रकल्पातून शुद्धीकरण केलेले पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरल्यामुळे मच्छीमारांची दमछाक थांबली आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या २० ते २२ मच्छीमार नौकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे.समुद्रकिनारी बाजारगल्लीजवळ १५ बाय १२च्या केबिनमध्ये सुमारे २० फुटी एक कूपनलिका बांधण्यात आली आहे. त्यामधून अद्ययावत जलशुद्धीकरण यंत्राद्वारे एका तासाला सुमारे ४५०० हजार लीटर पाणी तयार होते. येथील ५ हजार लीटरच्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाते. त्यामध्ये शुद्ध पाण्याचे प्रमाण सुमारे ३००० लीटर इतके असते. टाकाऊ पाणी येथील समुद्रकिनाऱ्यावरील सध्या सुरू असलेल्या मत्स्यविभागाच्या चौथऱ्याच्या कामासाठी व अन्य बांधकामासाठी वापरले जाते. मढच्या मच्छीमार नौकादेखील येथील शुद्ध पाण्याचा लाभ घेतात. तर येथील गरजू नागरिकांना वापरण्यासाठी आणि लग्नसराईसाठी सामाजिक बांधिलकी जपत मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो, अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष पराग भावे यांनी दिली. पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि येथील स्थानिक नगरसेवक यशोधर (शैलेश) फणसे यांचे सहकार्य मिळाल्याचे भावे यांनी सांगितले.