श्रीपाद सिमंतकर ल्ल उदगीरदुष्काळाच्या फटक्यानंतर जलपुनर्भरणाचे वारे वाहू लागले आहेत़ भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वैयक्तिक ते प्रशासनिक पातळीपर्यंत चळवळ निर्माण होत आहे़ याचाच टप्पा म्हणजे जिल्हा परिषदेने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलपुनर्भरण अनिवार्य केले आहे़ तसेच न केल्यास मे महिन्याचे वेतन न काढण्याचा पवित्रा घेतला आहे़लातूर जिल्हा दुष्काळात होरपळून निघाल्यानंतर भविष्यातील उपाययोजना करुन ही परिस्थिती टाळण्यासाठी विविध उपक्रमांव्दारे कार्य चालू आहे़ जलयुक्त शिवार प्रमाणे जनजागृती व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांनी जलसंचय वाढवावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत़ जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी जलपुनर्भरण करावे, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी विभागांना देण्यात आले़ उदगीर येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी १ जून २०१६ रोजी तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित जलपुनर्भरण करुन घेण्याच्या लेखी सूचना दिल्या़ तर गटशिक्षणाधिकारी यांनी या पत्रान्वये ६ जून रोजी पत्राव्दारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलपुनर्भरण करुन त्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत़
जलपुनर्भरणाचे ‘होमवर्क’
By admin | Published: June 13, 2016 11:28 PM