- राहुल कलाल, पुणेसलग दोन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे राज्यातील पाणी टंचाईने भीषण रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील २८५ तालुक्यांमधील १५ हजार ९६० गावांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी १ ते ४ मीटरपेक्षा जास्तने खालावल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.सन २०१४ मध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. गेल्यावर्षी २०१५ मध्ये चांगला पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र त्यावर पाणी फिरले आणि राज्यात दुष्काळ जाहीर करावा लागला. पाऊस न पडल्याने राज्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने घटली आहे. आता उन्हाळा येऊ घातल्याने आणि पुरेसा पाणीसाठा नसल्याने भूगर्भातील पाणी हाच प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. भूगर्भातील पाणी एक मीटरपेक्षा खाली गेले तरी तेथील भूजल संपण्याच्या मार्गावर पोहोचले, असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे या सर्व गावांना उन्हाळ्यात भूगर्भातून पाणी मिळणार नसल्याचे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे. या जिल्ह्यांंमधील स्थिती गंभीर या सर्वेक्षणात अहमदगनर, बीड, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा आणि सातारा या जिल्ह्यांतील भूजल पातळीची स्थिती गंभीर असल्याचे नोंदविण्यात आले आहे.राज्याच्या विविध भागांमधील भूजलाची पातळी काय आहे, याचे सर्वेक्षण राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केले. त्यात हे भीषण वास्तव समोर आले आहे. राज्यातील भूजल पातळीतील घटघटगावे ३ मीटरपेक्षा जास्त घट४,८२८२ ते ३ मीटरपेक्षा जास्त घट३,९५३१ ते २ मीटरपेक्षा जास्त घट७,१७९एकूण१५,९६०
१६ हजार गावांमध्ये पाणीटंचाई
By admin | Published: February 25, 2016 12:35 AM