पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु गेल्या काही दिवसांत उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पाण्याची बचत न केल्यास पुणेकरांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणीबचत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून, पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिला आहे.राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पुणेकरांना मागील दोन वर्षे सलग एप्रिल-मे महिन्यांत गंभीर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे. परंतु, यंदा खडकवासला प्रकल्पातील टेमघर धरण वगळता सर्वंच धरणांमध्ये चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये आज अखेर प्रकल्पातील चार धरणांमध्ये १०.७१ टीएमसी म्हणजे ३६.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला केवळ २२ टक्के म्हणजेच ६.५५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यामुळे गतवर्षी पुणेकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा धरणांमध्ये चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याने दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु यामुळे नागरिकांकडून महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. उन्हाचा तडाखा असाच कायम राहिल्यास धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाणदेखील वाढेल व नागरिकांकडून पाण्याचा वापरही वाढेल. याचा परिणाम मान्सूनचा पाऊस लांबल्यास शहरावर मे अखेर अथवा जुलैमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होईल.सध्या खडकवासला प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यातून पुणे शहरासाठी दर महिन्याला सुमारे सव्वा टीएमसी पाणी देण्यात येते. तसेच या मध्ये हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी खास आवर्तने राखीव ठेवण्यात आलेली आहेत. याशिवाय लहान-मोठ्या ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठादेखील खडकवासला धरणावरच अवलंबून आहे. त्यातच बाष्पीभवनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुणेकरांनी पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.>खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्याची स्थितीपाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिला. >धरणटीएमसीटक्के खडकवासला१.७८९०.४०पानशेत६.७१६३.०२वरसगाव२.२४१७.४५टेमघर(दुरुस्ती सुरू)-एकूण१०.७१३६.७४
बचत न केल्यास पाणीटंचाईचे सावट
By admin | Published: April 05, 2017 12:42 AM