शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पाणीपुरवठ्याचा निधी खिशात !

By admin | Published: June 14, 2016 4:53 AM

ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी किमान दीड हजार कोटी रुपये लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या खिशात गेल्याने १६४५ योजना

- यदु जोशी,  मुंबई

ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी किमान दीड हजार कोटी रुपये लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या खिशात गेल्याने १६४५ योजना बंद पडल्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांत या योजनांवर सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमध्ये ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे सरकारने केलेल्या चौकशीत समोर आले आहे. ही चौकशी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केली होती. तर दुष्काळग्रस्त उस्मानाबादसह बुलडाणा, अकोला, वाशिम आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे लोकमतने केलेल्या पाहणीत दिसून आले. आघाडी सरकारच्या काळात ग्रामसभेने निश्चित केलेल्या पाणीपुरवठा समित्यांना २ कोटी रुपयांपर्यंतच्या योजनांची जबाबदारी देण्यात आली. या समित्यांना कोणतेही प्रशासकीय वा तांत्रिक ज्ञान नव्हते. अनेक गावांमध्ये सरपंच वा स्थानिक पुढाऱ्यांचे नातेवाईकच कंत्राटदार बनले. दोन ते साडेसात कोटी रुपयांपर्यंतच्या प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा समितीला होते. जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना तांत्रिक मान्यतेचे अधिकार होते. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्यांची सखोल चौकशी झाली तर अनेक लोक कारवाईच्या रडारवर येऊ शकतात. (क्रमश:)केंद्राने निधी थांबविला- ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी दिलेला निधी कुठे खर्च झाला, त्यातून पाणीपुरवठा का झाला नाही, अशी विचारणा केंद्राने केली असून अर्थसाहाय्यामध्ये कपात केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांची कामे जवळपास ठप्प पडली आहेत. - केंद्राकडून दरवर्षी भरीव निधी मिळत होता. २०१२-१३ मध्ये केंद्राने ८४६ कोटी ४८ लाख रुपये, २०१३-१४ मध्ये ६९० कोटी रुपये तर २०१४-१५ मध्ये ७४८ कोटी रुपये दिले. मात्र, २०१५-१६ मध्ये केवळ ३३० कोटी रुपये दिले. यंदा निधीच दिलेला नाही.योजना राबवल्या, पण पाणी नाहीचबुलडाण्याच्या शेलगाव देशमुख (ता. मेहकर) साठी पाच लाखांची योजना राबवूनही पाणी मिळाले नाही. जलस्वराज ही ५५ लाखांची दुसरी योजना आणली. टाक्या लावल्या, पण पाणीच चढले नाही. ‘महाजल’ अंतर्गत ७६ लाख रुपयांची योजना राबविली. याप्रकारे १ कोटी ३६ लाख रुपये खर्च होऊनही पाणी मिळाले नाही.