शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

१९ वर्षांत प्रथमच आले नळाला पाणी

By admin | Published: June 11, 2015 10:33 PM

भंडारमाची ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव : जलसंधारणांमुळे गावाची टॅँकरमुक्तीकडे वाटचाल -- गूज न्यूज

सातारा : कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावात सिमेंट नालाबांध मार्च २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आला. परिणामी मेमध्ये झालेल्या वळवाच्या पावसामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा जलस्तर वाढून १९ वर्षांत मे महिन्यात प्रथमच नळातून पाणी वाहू लागले. गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भंडारमाचीची वाटचाल आता टँकरमुक्तीकडे सुरू आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या भंडारमाचीची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे. पाणी टंचाईच्या काळात जिल्ह्यात सर्वप्रथम भंडारमाचीला टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. या गावामध्ये कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत सन २०१४-१५ मध्ये तीन सिमेंट नालाबांध, २४ शेततळे, २२ इलेट्रिक मोटरपंप संच, शेतकरी अभ्यास दौरा, एक शेतीशाळा, शंभर एकरवर पीक प्रात्यक्षिके, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आदी कामे करण्यात आली. लोकसहभागातून गाव तलावातील १५३ घनमीटर गाळ काढल्यामुळे उन्हाळी पावसात हा गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. गावामध्ये २४ शेततळी पूर्ण करण्यात आली. या शेततळ्यास अस्तरीकरण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्यात येणार आहे. याचा उपयोग पिकाला संरक्षित पाणी देण्यासाठी होणार आहे. यंदा मे महिन्यात प्रथमच विहिरींचा जलस्तर वाढल्याने भंडारमाची गावात १९ वर्षांनंतर नळाला पाणीपुरवठा झाल्याचे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारमाचीमध्ये झालेल्या जलसंधाणाच्या कामाबाबत शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. (प्रतिनिधी)पाणीच-पाणी चोहीकडेनालाबांधमुळे गावामधील नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सध्या भरपूर पाणी मिळत आहे. गावामध्ये ३५० हेक्टर कंपार्टमेंट बंडिंगचे काम झाले आहे. या कामामुळे भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. गावातील विहिरींची पाणीपातळी चार ते पाच फुटांनी वाढली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान, कृषी विभागाच्या योजना यांच्या संगमातून जलसंधारणाचा खराखुरा परिणाम गावात पाहायला मिळत आहे. - जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दरवर्षी गावामध्ये दुष्काळ असायचा. गावामध्ये टँकर यायचा आणि पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची; पण यंदाच्या मे महिन्यात प्रथमच नळाला पाणी मिळाले आणि तेही भरपूर. आमचं गाव आता दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करत आहे, याचा आनंद वाटतो. - प्रमिला जगदाळे, महिला ग्रामस्थकृषी विभागामार्फत झालेल्या नालाबांधमुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी १५ ते १६ फुटांनी वाढली आहे. निश्चितपणे भविष्यात भंडारमाची गाव टँकरमुक्त होईल. - अजित जाधव, ग्रामसेवकमाझ्या विहिरीला पाणीच नसायचे. त्यामुळे दहा मिनिटे देखील मोटार चालत नव्हती. मार्चमध्ये झालेल्या नालाबांधमुळे माझ्या विहिरीला पाणी वाढले आहे. त्यामुळे आता शेतीला मुबलक पाणी मिळू शकेल.- रामचंद्र मदने, शेतकरी