शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

पिंपळगाव जोगातून तीन जिल्ह्यांना पाणी

By admin | Published: April 14, 2016 1:20 AM

पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यांसाठी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार

नारायणगाव (जि. पुणे) : पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यांसाठी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने पाणीप्रश्न पुन्हा पेटणार, अशी चिन्हे आहेत. कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवून दि़ १५ किंवा १६ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे़ कुकडी, घोड आणि दारणा या धरणांतून पाणी सोडण्याबाबत मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली़ नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार दिलीप गांधी, आमदार दिलीप वळसे-पाटील, राहुल जगताप, विजय औटी, बाबूराव पाचर्णे, नारायण पाटील, स्रेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते़ कुकडी पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे ज्या धरणात ४ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, त्या धरणातून पिण्याबरोबरच फळबागा वाचविण्यासाठी कुकडीतून आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी झाली़ महाजन म्हणाले, की पिंपळगाव जोगा धरणात ४.४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या धरणातून २.३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ पिंपळगाव जोगा धरणातून येडगाव धरणात आणि त्या धरणातून कुकडी डावा व मीना शाखा कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ डिंभे उजवा कालव्यातून येणारे पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)पिंपळगाव जोगा धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यापर्यंत सोडण्यात येणार आहे़ पोलीस बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.