दुसरा टप्पा : आराखडा तयार असूनही मिळेना गती; निविदा प्रक्रिया धिम्या गतीनेबीड : जलयुक्त अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात सर्वाधिक गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आली आहे. २५६ गावांकरिता प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळूनदेखील केवळ १६ गावांत आतापर्यंत ४३ कामे पूर्ण झाली आहेत.जलसंधारणाच्या दृष्टीने मार्च अखेरपर्यंत पहिला टप्पा आटोपून मेपासून दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणे गरजेचे होते; मात्र निविदेप्रमाणे कामे होणार असल्याने प्रक्रियेत अडसर निर्माण झाला. अधिकाऱ्यांनीही याकामी उदासीनता दाखविल्यामुळे अनेक गावांत कामाचा प्रारंभही झालेला नाही. पावसाळा सुरू होण्यापूर्वी निम्यापेक्षा अधिक कामे पूर्ण करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी आढावा बैठकीदरम्यान केला होता; मात्र बीड, अंबाजोगाई, आष्टी, परळी वगळता इतर तालुक्यांमध्ये या अभियानास अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.कृषी विभागांतर्गत यंदा प्रथमच निविदेप्रमाणे कामे केली जात आहेत. खोल सलग समतल चर बांधबंदिस्ती, नियमित सलग समतल चर, मातीनाला बांध दुरुस्ती, सिमेंट नाला बांध दुरुस्ती यासारख्या कामांवर भर देण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्याकरीता निवडण्यात आलेल्या सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेऊन कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होऊनदेखील कामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा कितपत फायदा मिळेल, याबद्दल शंकाच वाटते. (प्रतिनिधी)अशी आहे जलयुक्त कामांची स्थिती२५६ गावांमध्ये एकूण ४३ कामे सुरू आहेत. यापैकी केवळ बीड तालुक्यातीलच २ कामे पूर्ण झाली असून, ४१ कामे प्रगतिपथावर असल्याचा अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्यात आला आहे. बीड तालुक्यात पालवण, ताडसोन्ना, नवगण राजुरी परिसरात दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली असून, त्याचा परिणाम जलसिंचनाच्या दृष्टीने समोर येत आहे.
२५६ पैकी केवळ १६ गावांत जलयुक्तची कामे
By admin | Published: June 13, 2016 11:19 PM