पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारी उष्णतेची लाट रविवारी काही प्रमाणात ओसरली असून अनेक ठिकाणच्या कमाल तापमानात किंचित घट झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले असून सर्वात कमी किमान तापमान पुण्यात १८़२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.देशात बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडका वाढला असून हिमाचल प्रदेश, झारखंड तसेच दिल्ली, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, हरियाना, तेलंगणा येथील अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आहे़ दोन दिवसांत उत्तर पश्चिम भारतातील काही ठिकाणी दिवसांच्या तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असून मध्य भारत, पश्चिम भारत व अन्य ठिकाणच्या तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे़राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमान पुढीलप्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.७, जळगाव ४२.३, कोल्हापूर ३८.४, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४२.८, नाशिक ३६.६, सांगली ४०़१, सातारा ३९़६, सोलापूर ४२़५, मुंबई ३३, अलिबाग ३१.४, रत्नागिरी ३१.९, डहाणू ३४.१, उस्मानाबाद ४२़८, औरंगाबाद ४०.२, परभणी ४३.४, नांदेड ४४़५,अकोला ४२़२, अमरावती ४१.४, बुलडाणा ३८.६, चंद्रपूर ४५, गोंदिया ४१.६, नागपूर ४४.२, वर्धा ४४.१, यवतमाळ ४३. (प्रतिनिधी) विदर्भात उष्माघाताचेचार बळीयवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात तीन दिवसांत उष्माघाताने दोघांचा बळी घेतला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथील पेपर मिल भागात ७५ वर्षीय वृद्धाचा आणि अमरावतीतील इर्विन चौकात भिकारी वृद्धेचा मृतदेह रविवारी सायंकाळी आढळून आला. त्यांचाही मृत्यु उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. दुर्गा जाधव (१७) आणि कैलास गणपत ढगे (४८) अशी पुसद तालुक्यात उष्माघाताने मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. बल्लारपूर येथील मृताची ओळख पटली नसून तो शनिवारी दुपारी रस्त्याने जात असताना खाली कोसळला आणि गतप्राण झाला. तो देहरादूनचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उष्म्याची लाट किंचित ओसरली!
By admin | Published: April 18, 2016 1:31 AM