शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

लातुरात झाली आघाडी

By admin | Published: January 30, 2017 12:33 AM

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असून, औसा विधानसभा मतदार संघातील गट व गणातील जागांची बोलणी अद्याप सुरू आहे़

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असून, औसा विधानसभा मतदार संघातील गट व गणातील जागांची बोलणी अद्याप सुरू आहे़ उर्वरित ४ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वाट्याला जि़प़च्या १० तर पंचायत समितीसाठी ११ जागा आल्या आहेत़ या संदर्भात आघाडीची गेल्या पंधरा दिवसांपासून बोलणी सुरू होती़ दोन्हीही पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या असताना आघाडीचे संकेत दिले जात होते़ रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत आमदार दिलीपराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील यांनी आघाडी झाल्याचे जाहीर केले़ लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदार संघातील गट व गणाच्या जागांची बोलणी पूर्ण झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मुरूड, अहमदपूर विधानसभा मतदार संघातील शिरूरताजबंद, रोकडा सावरगाव, खंडाळी, नळेगाव, जानवळ, चापोली, उदगीर विधानसभा मतदार संघातील तोगरी, लोहारा आणि निलंगा विधानसभा मतदार संघातील हलगरा जि़प़ गट सोडण्यात आला आहे़ याच गटातील प्रत्येकी १ पं़स़ गणाची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे़ लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील २ पंचायत समितीच्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या आहेत़ जि़प़च्या १० आणि पंचायत समितीच्या ११ जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्या असून उर्वरित ३९ गट आणि ८७ गण काँग्रेसकडे असल्याची माहिती दिलीपराव देशमुख, बाबासाहेब पाटील यांनी या पत्रपरिषदेत दिली़९ गट, १८ गणांसाठी बोलणी सुरूलातूर जिल्हा परिषदेत एकूण ५८ जागा आहेत़ त्यापैकी औसा विधानसभा मतदार संघातील जागांची बोलणी सुरूच आहे़ औसा विधानसभा मतदार संघात जि़प़चे ९ गट आणि पं़स़चे १८ गण आहेत़़ पुढील दोन दिवसांत या संदर्भात निर्णय होणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले़