शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

विक्रमगडातील इमूपालन बंद होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 3:46 AM

शेती पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेला इमू पालन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

राहुल वाडेकर,

विक्रमगड- शेती पूरक व्यवसाय म्हणून गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन सुरू केलेला इमू पालन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पालनाचा वाढता खर्च व इमूची इंडी आणि मांस याला भाव आणि बाजारपेठ नसल्यामुळे हा व्यवसाय करणारे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत. इमू पालन करणा-या शेतकऱ्यांना इमू पक्षांना रोजचे खाद्य पुरविणे शक्य होत नसल्याने इमू मृत्यूमुखी पडत आहेत़ गोदामामध्ये पुरेसे उपलब्ध खाद्य नाही, खाद्य आणण्यासाठी शेतक-यांजवळ पुरसा पैसा नाही़ अंडी विकत घेण्यावरही मर्यादा पडल्या आहेत़ तसेच विकत घेतलेल्या अंडयाचे पैसे मिळत नाहीत,त्यामुळे अंडीही गोदामध्ये पडुन राहात आहेत़ या व्यवसायाकरीता घेतलेल्या कर्जाचा डोंगर त्यावर आकारले जाणारे व्याज व हया व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी अशा दुहेरी संकटात इमू पालन करणारा शेतकरीवर्ग सापडल्यामुळे हा व्यवसाय बंद झाला आहे़विक्रमगड तालुक्यातील मौजे उटावली-चौधरीपाडा येथील शेतकरी निकुळे यांनी त्यावेळेस आपल्या मालकीच्या जागेमध्ये गेल्या ७ वर्षापूर्वी इमूपालन सुरु केले होते,परंतु हया व्यवसायाला बाजारात शुन्य किंमत असल्याने त्यांनी या व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडणेही मुश्किल झाले आहे. त्यांचेजवळ ५७ पक्षी होते,त्यातील काही पक्षी खादयाविना मृत्यू पावले आहेत़ तर काही ओळखीच्या माणसांना त्यांनी विनामोबदला दिले़ त्यानंतर त्यांच्याजवळ १६पक्षी शिल्लक होते ते जगविण्यासाठी त्यांना रोजचा २०० रुपये हुन अधिक खर्च करावा लागत होता़ पक्षांना खादय दिले नाही तर ते मरतात़ या व्यवसायाकरीता घेतलेल कर्ज त्यांच्यावर आहे़ आतापर्यत १० लाख खर्च करुन मुद्दलही सुटले नाही. त्यामुळे व्यवसाय बंद केला तरी त्यांना त्यासाठी घेतलेले कर्ज फेडावे लागते आहे असेच अनेक विक्रमगड तालुक्यातील अनेक शेतक-यांनी हा व्यवसाय सुरु केला होता. ते सगळेच अडचणीत आहेत़ शेतीपूरक व्यवसाय म्हणून इमू पालन व्यवसायासाठी सहकारी बँकेकडून शेतक-यांना कर्जे देण्यांत आली होती त्यामुळे अनेकांनी उत्साहाने हा व्यवसाय सुरू केला. परंतु अंडी विकत घेतली जात नाहीत विकली गेली तर त्याचे पैसे मिळत नाहीत़ त्याच्या मांसालाही मागणी नाही. त्यात खाद्य महागलेले अशा स्थितीत हा व्यवसाय बंद करण्यावाचून शेतक-यांपुढे अन्य पर्यायच उरलेला नव्हता.इमू हा मूळचा आॅस्ट्ेलियन पक्षी आहे़ भारतामध्ये प्रथम १९९६ पासुन आंध्र प्रदेशात इमू पालनास सुरुवात झाली़ इमू पक्ष्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांपासुन उत्पन्न मिळते. एका वर्षात एका इमूपासुन २५ ते ४० अंडी मिळतात़ इमूचे मांस ९८ टक्के कॉलेस्ट्रॉल फ्री असते़ पूर्ण वाढ झालेल्या एका इमू पासुन ३ ते ५ लिटर कच्चे तेल मिळते़ इमूच्या एका अंडयाला प्रत्येकी १५०० ते १७०० रुपये भाव मिळत होता,तर त्याच्यापासून मिळणा-या तेलाला प्रती लिटर ३००० ते ४००० रुपये बाजारभाव मिळतो याचा अर्थ या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचे जे गोंडस चित्र शेतकऱ्यांपुढे मांडले गेले ते बनावट असावे व केवळ इमू विक्रेत्यांचा लाभ घडविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारी करून हा व्यवसाय करण्यास भरीस पाडले गेल्याची चर्चा आहे.>व्यावसायिकांची फसवणूक केली की बाजार घसरला?प्रारंभी इमूची तीन महिन्यांची जोडी प्रत्येकी १८ हजार रुपयांना होती मात्र,त्यानंतर जोडीचा बाजारभाव प्रयेकी २००० रुपये एवढा झालेला होता़. इमूच्या अंडयास प्रारंभी ५०० रुपये एवढाच बाजारभाव मिळत होता. आता तो शून्य आहे. एका इमूला दिवसाला १६.५० भावाचे १ किलो खाद्य लागते़ इमू पासून फायदा मिळु शकतो असे त्यावेळेस शेतक-यांना सांगण्योंत आले होते त्यानुसार हा व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरुवात केली मात्र अशा कोणत्याही प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना न झाल्याने हा व्यवसाय संकटात सापडलेला आहे़ त्यापासुन नफा होण्याएैवजी शेतकरी तोटयात चाललेले आहे़ या व्यवसायसाकरीता घेतलेले कर्ज अजुनही डोक्यावर आहे़ त्यामुळे आता हा व्यवसाय जवळ जवळ बंद झालेला आहे़