शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

वैद्यकीय कोटा वाढवून मराठा आरक्षणावर तोडगा काढावा - मराठा महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:41 PM

मराठा आरक्षणाचा निर्णय राबवण्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे...

ठळक मुद्देआरक्षणाचा प्रस्तावित कोटा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला लागू होणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा एकदा वादाची स्थिती

पुणे : यंदाच्या शैक्षणिक सत्रात खुल्या किंवा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येएवढ्या  जागा इंडियन मेडिकल कौन्सिल आणि संबंधित संस्थांची परवानगी घेऊन वाढवाव्यात, असा तोडगा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सुचवला आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय राबवण्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यापुर्वीच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याचे निरीक्षण नोंदवीत या आरक्षणाचा प्रस्तावित कोटा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेला लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. राज्याची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावरुन राज्यात पुन्हा एकदा वादाची स्थिती उद्भवली आहे.याप्रश्नी वैधानिक मार्ग काढणे शक्य असल्याचे कोंढरे म्हणाले. त्यांनी सांगितले, की नीटची प्रक्रिया आधी सुरु झाली असली तरी राज्याची प्रक्रिया फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु झाली आणि त्यात एसईबीसी आरक्षणाचा निर्णय लागू करण्यात आला. कारण एसईबीसी कायदा आॅक्टोबर 2018 मध्येच राज्यात लागू झाला. त्यामुळे यंदाच्या वर्षी एसईबीसीच्या जागांचा कोटा राहणार नाही, असे मराठा आरक्षण विरोधकांचे मत असले तर एसईबीसीनंतर म्हणजे जानेवारी 2019 मध्ये केंद्रात आणि १२ फेब्रुवारीपासून राज्यात ईड्ब्लूएस आरक्षण लागू करण्यात आले आहे, हेही त्यांनी ध्यानात घ्यावे. एखादा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येत नाही, हे जर बरोबर असेल तर मग ईड्ब्ल्यूएसचे केंद्राचे नोटिफिकेशन हेही नंतरचे आहे. मात्र त्याला कोणीही आव्हान दिले नाही, असे कोंढरे यांनी निदर्शनास आणून दिले. कोंंढरे म्हणाले, की वास्तविक एसईबीसीच्या वैदकीय कोट्याच्या बाबत  मुंबई उच्च न्यायालयात याअगोदर एक याचिका फेटाळली गेली होती. नागपूर खंडपीठात प्रक्रिया अगोदर सुरु झाल्याचा आक्षेप घेत एक याचिका दाखल झाली त्यात न्यायालयाने सुरुवातीला स्थगिती दिली. नंतर सुनावणी घेऊन ही स्थगिती उठवली. त्यानंतरच ही प्रवेश प्रक्रिया पुढे जाऊन मराठा विद्यार्थ्यांनी शुल्क भरुन प्रवेश घेतले. त्यावेळी एसईबीसीचा पर्याय उपलब्ध असल्याने या विद्यार्थ्यांना त्याबद्दल दोष देता येणार नाही. मात्र आताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने प्रश्न गंभीर झाला आहे. .............राज्य सरकारकडून अपेक्षाएसईबीसी कायदा सध्या अस्तित्वात असून सरकारने या कायद्यातील कलम 17 अन्वये जे अधिकार दिले आहेत, त्यात काही दुरुस्ती करता येते का या संदर्भात सरकारने कायदेशीर सल्ला घ्यावा. अशी दुरुस्ती अंमलात आणली तर मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश संरक्षित करता येतील. यासाठी गरज पडल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन सरकारने अध्यादेश काढावा. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जे खुल्या किंवा एसईबीसी प्रवगार्तील प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन तितक्याच जागा वाढवाव्यात. तामिळनाडूतील आयआयटी प्रवेश प्रक्रियेत न्यायालयीन अडचण निर्माण झाली असता, याच मागार्चा अवलंब करुन तोडगा काढला गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने ज्येष्ठ विधीज्ञांचा सल्ला घेऊन मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश त्वरीत संरक्षीत करावेत अन्यथा त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील खटल्याची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून हा निकाल लवकरात लवकर लागल्यास पुढील अनेक प्रश्न टाळता येतील.  - राजेंद्र कोंढरे, सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ

टॅग्स :Puneपुणेmaratha mahasanghमराठा महासंघreservationआरक्षणState Governmentराज्य सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय