घोडेगाव (जि़ पुणे) : माळीण पुनर्वसनासाठी गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करण्यास ग्रामस्थांनी सहमती दिली असून, लवकरच या सोसायटीमार्फत कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी घरांची कामे सुरू होणार आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत माळीण दुर्घटना पुनर्वसन सहकारी संस्था मर्या. माळीण या नावाने सोसायटी स्थापन करण्यास ग्रामस्थांनी सहमती दिली आहे़ माळीण ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे घरकुले बांधण्यासाठी सुमारे ४ कोटी रुपये खर्च येणार आहे. घरे बांधण्यासाठी शासनाने १.४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत तर या घरांसाठी अजून २.५६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी ९० लाख रुपये विविध सेवाभावी संस्था व औद्योगिक कंपन्या यांनी देण्याचे कबूल केले आहे. हे पैसे जमा करून घेण्यासाठी व उर्वरित आवश्यक पैसे गोळा करण्यासाठी सोसायटी स्थापन करण्याचा पर्याय काढला आहे.
माळीणच्या पुनर्वसनाचा मार्ग झाला मोकळा!
By admin | Published: July 03, 2015 3:06 AM