शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 2:05 PM

अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Devendra Fadnavis ( Marathi News ) : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागील दशकभरात कथित सिंचन घोटाळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र हेच अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी तेव्हा मी केलेले आरोप खरे ठरल्याचा दावा केला आहे.

"२०१४ मध्ये अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करणं ही एक चूक होती का?" असा प्रश्न 'द इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "मी केलेले सर्व आरोप नंतर खरे ठरले आहेत. मी जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यावरून कारवाईही करण्यात आली आहे. त्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करून चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे. काही लोक दोषी ठरले आहेत. यामुळे सिंचन खात्यातील काही नियमांची दुरूस्तीही करण्यात आली, याचं मला समाधान आहे. या खात्यात होणारा भ्रष्टाचार नंतर बंद झाला आणि टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणली गेली," अशा शब्दांत फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.

"आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण..." 

सिंचन घोटाळ्याविषयी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "या प्रकरणात आम्ही अजित पवार यांच्यावर आरोप केले, कारण ते या खात्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांना जबाबदार धरणं स्वाभाविक होतं. मागच्या १३-१४ वर्षांमध्ये यंत्रणांनी सर्व बाबींचा तपास केला आहे. मात्र एकाही चार्जशीटमध्ये यंत्रणांना या प्रकरणात अजित पवारांचा थेट सहभाग आढळून आला नाही. त्यामुळे आम्हाला यंत्रणांचा तपास मान्य करावा लागला."

कोकण विभागात काय घडलं?

कथित सिंचन घोटाळ्यात अजित पवारांचा एकाही प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. "कोकण विभागातील प्रकरणांमध्ये आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या भूमिकांबाबत अजूनही चौकशी करत असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं होतं. मात्र नंतर या तपासातही अजित पवार आणि तटकरेंचा घोटाळ्यातील सहभाग आढळून आला नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारCorruptionभ्रष्टाचारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४