शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

धनगर आरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध

By admin | Published: January 09, 2015 1:46 AM

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत;

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे धनगर समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत; परंतु हे आरक्षण देताना आदिवासींच्या ७ टक्के आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ते देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी येथे केले़ भाजपाच्या संघटन पर्वाअंतर्गत अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने आयोजित प्रदेश पातळीवरील कार्यशाळेनिमित्त शहरात आलेले सवरा पत्रकारांशी बोलत होते़ सावरा म्हणाले, आदिवासी कायद्याच्या कक्षेत धनगर समाज बसत नाही़ धनगर ही जमात आदिवासींमध्ये नाही़ आदिवासींमध्ये धनगड ही आदिवासी जमात आहे; परंतु याचे नामसाधर्म्य साधून धनगर समाजाला आदिवासींमध्ये बसविता येणार नाही़ याबाबत मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल़ आदिवासी विभागाचा मोठा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा लागतो़ परंतु कामांची गती व गुणवत्ता पाहिजे तशी नसते यामुळे आदिवासी विभागाअंतर्गतच बांधकाम विभाग सुरू करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असे ते म्हणाले.मुंबईला पाणी देण्यापूर्वी स्थानिकांना प्राधान्य त्र्यंबक तालुक्याच्या सीमेवरील पिंजाळ नदीवरील प्रकल्प पूर्ण करून त्याचे पाणी मुंबईला पुरविण्यात येणार आहे़ या प्रकल्पाला केंद्रीय जलसंधारणमंत्री उमा भारती यांनी बुधवारी मंजुरी दिली आहे़ याबाबत आदिवासीमंत्री सवरा म्हणाले, या प्रकल्पाचा मूळ उद्देश नाशिक व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचा पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा होता़ आता या प्रकल्पाचे पाणी मुंबईला जाणार असले तरी प्राधान्याने स्थानिकांचा पाण्याचा प्रश्न मिटवून नंतरच पाणी मुंबईला दिले जाईल़, असे त्यांनी सांगितले.