आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 10:38 PM2024-07-06T22:38:57+5:302024-07-06T22:40:19+5:30

शिंदे म्हणाले, "दोन वर्षे कशी गेली कळले नाही. मोठा पल्ला गाठलाय. खरे तर दोन वर्ष हा फार कमी कालावधी आहे. मात्र, आधीची अडीच वर्ष आणि या दोन वर्षांची तुलना तुम्ही केली, तर तुम्हाला सहज समजले की, आम्ही किती निर्णय घेतले? काय निर्णय घेतले? आणि कुणासाठी घेतले?

We are not born with a golden spoon, but we will definitely do the work of making the life of the common people of this state golden CM Eknath Shinde told the Trisutri of Mahayuti | आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र, या राज्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की करणार. तसा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना व अंमलबजावणीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना शिंदे म्हणाले, "दोन वर्षे कशी गेली कळले नाही. मोठा पल्ला गाठलाय. खरे तर दोन वर्ष हा फार कमी कालावधी आहे. मात्र, आधीची अडीच वर्ष आणि या दोन वर्षांची तुलना तुम्ही केली, तर तुम्हाला सहज समजले की, आम्ही किती निर्णय घेतले? काय निर्णय घेतले? आणि कुणासाठी घेतले? हेच निर्णय आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे.

महायुती सरकारची त्रिसूत्री -
महायुती सरकारची त्रिसूत्री सांगताना शिंदे म्हणाले, "आपले सरकार, जनतेचा विचार, विकास आणि श्वास या त्रिसूत्रीवर काम करत आहे. आज लोकांना माहीत आहे की, हे सरकार काम करणारे सरकार आहे. हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारे सरकार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजीही उशिरापर्यंत काम करतात. अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात. त्यामुळे २४/७ हे सर्कल सुरू आहे."

हे जनतेचं सरकार...!
"हे सरकार जनतेचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे. गेली दोन वर्षे आपण पाहिले तर, आमच्या कॅबिनेटमध्ये एकहिनिर्ण वैयक्तिक लाभाचा घेतलेला नाही. सुरुवातीला मी आणि देवेंद्र फडणवीस होतो, आम्ही पहिल्या कॅबिनेटचा निर्णयही शेतकऱ्यांसाठीच घेतला. आम्हाला वैयक्तीक काहीच नाही.  केवळ या राज्यातील सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. माझ्या राज्यातील शेतकरी, माता भगिणी यांना चांगले दिवस यायला हवेत. त्यांच्या आयुष्यात बदल घडायला हवा," असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

 

Web Title: We are not born with a golden spoon, but we will definitely do the work of making the life of the common people of this state golden CM Eknath Shinde told the Trisutri of Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.