शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
4
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
5
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
6
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
7
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
8
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
9
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
10
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
11
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
12
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
13
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
14
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
15
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
16
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
17
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
18
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
19
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
20
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण...; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली महायुतीची त्रिसूत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 10:38 PM

शिंदे म्हणाले, "दोन वर्षे कशी गेली कळले नाही. मोठा पल्ला गाठलाय. खरे तर दोन वर्ष हा फार कमी कालावधी आहे. मात्र, आधीची अडीच वर्ष आणि या दोन वर्षांची तुलना तुम्ही केली, तर तुम्हाला सहज समजले की, आम्ही किती निर्णय घेतले? काय निर्णय घेतले? आणि कुणासाठी घेतले?

आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र, या राज्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्याचं सोनं करण्याचं काम आम्ही नक्की करणार. तसा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना व अंमलबजावणीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना शिंदे म्हणाले, "दोन वर्षे कशी गेली कळले नाही. मोठा पल्ला गाठलाय. खरे तर दोन वर्ष हा फार कमी कालावधी आहे. मात्र, आधीची अडीच वर्ष आणि या दोन वर्षांची तुलना तुम्ही केली, तर तुम्हाला सहज समजले की, आम्ही किती निर्णय घेतले? काय निर्णय घेतले? आणि कुणासाठी घेतले? हेच निर्णय आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे.

महायुती सरकारची त्रिसूत्री -महायुती सरकारची त्रिसूत्री सांगताना शिंदे म्हणाले, "आपले सरकार, जनतेचा विचार, विकास आणि श्वास या त्रिसूत्रीवर काम करत आहे. आज लोकांना माहीत आहे की, हे सरकार काम करणारे सरकार आहे. हे सरकार फिल्डवर उतरून काम करणारे सरकार आहे. आता बघा, मी उशिरापर्यंत काम करतो, देवेंद्रजीही उशिरापर्यंत काम करतात. अजित दादा सकाळी उठून लवकर काम चालू करतात. त्यामुळे २४/७ हे सर्कल सुरू आहे."

हे जनतेचं सरकार...!"हे सरकार जनतेचे आहे. मी नेहमीच सांगतो, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, गोरगरिबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे आहे, कष्टकऱ्यांचे आहे, माझ्या माता-भगिनींचे आहे, माझ्या बांधवांचं आहे, युवकांचे आहे, ज्येष्ठांचे आहे, वारकऱ्यांचे आहे, सर्वांचे आहे. गेली दोन वर्षे आपण पाहिले तर, आमच्या कॅबिनेटमध्ये एकहिनिर्ण वैयक्तिक लाभाचा घेतलेला नाही. सुरुवातीला मी आणि देवेंद्र फडणवीस होतो, आम्ही पहिल्या कॅबिनेटचा निर्णयही शेतकऱ्यांसाठीच घेतला. आम्हाला वैयक्तीक काहीच नाही.  केवळ या राज्यातील सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. माझ्या राज्यातील शेतकरी, माता भगिणी यांना चांगले दिवस यायला हवेत. त्यांच्या आयुष्यात बदल घडायला हवा," असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस