शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही, आव्हाडांचा शेलारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 1:45 PM

आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे.

ठळक मुद्देउद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर विधान करणे आशिष शेलार यांना शोभत नाहीमराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहेआम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही

मुंबई - भाजपा नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या विधानावरून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वाद पेटला आहे. सीएएच्या अंमलबजावणीला नकार द्यायला उद्धवच्या बापाचे राज्य आहे का, असे विधान करणाऱ्या शेलार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर विधान करणे आशिष शेलार यांना शोभत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आशीष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ''उद्धवच्या बापाचे राज्य आहे का? असे जाहीर विधान करणे आशिष शेलार यांना शोभत नाही.आणि होय, मराठी मातीला आई आणि मराठी माणसाला बाप मानण्याची आमची संस्कृती आहे. आम्ही गुजरात मध्ये बापाचा शोध घेणाऱ्यातले नाही आहोत.''  केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.  नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना  आशिष शेलार यांनी वादग्रस्त टीका केली होती. नालासोपाऱ्यातील एखा कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले होते की, “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, अशी वादग्रस्त टीका शेलारांनी यावेळी केली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरे