शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 4:28 PM

Maharashtra caretaker CM and Shiv Sena chief Eknath Shinde : भाजपच्या वरिष्ठांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असतो, तसा आम्हाला देखील तो अंतिम असेल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत.

ठाणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता कोण मुख्यमंत्री होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत.  मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केले. नाराज होऊन आम्ही रडणारे नाही. तर जनतेसाठी काम करणारे आहोत. रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली. त्याचं प्रतिबिंब आज पाहत आहोत. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

निवडणुकीत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटे पर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोपल्यावर माझी सभा असायची. हे चक्र निवडणुकीभर चाललं. मी ८० ते ९० सभा घेतल्या. मी प्रवासही मोठा केला. पायाला भिंगरी लावून कार्यकर्ता काम करतात, तसं मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आजही करत आहे. मी मुख्यमंत्री समजलो नाही. कॉमन मॅन म्हणून काम केलं. त्यामुळे मला प्रोटोकॉलचा अडथळा येत नव्हता. त्यामुळे जनतेसाठी काही ना काही केले पाहिजे असे वाटत होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सर्व घटकांसाठी आम्ही काम करत आहोत. माझ्या कामाबद्दल मी समाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठबळ दिले, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. तसेच, आमच्या सरकारने सर्वात जास्त निर्णय  घेतले. दीड वर्षात केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे. या काळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याकडून मोठा पाठिंबा मिळाला. लाडक्या बहि‍णींचा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. त्यामुळे मी जे काम करेन, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी करेन आणि रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करेन, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, बाळासाहेब यांची सर्वसामान्य शिवसेनिक हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा होती, ती इच्छा मोदी यांनी पूर्ण केली. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो घेतील तो शिवसेना म्हणून आम्हाला सुद्धा मान्य असेल. आमच्यात काही कोंडी, अडचण असे काहीच नाही. भाजपच्या वरिष्ठांना ज्या पद्धतीने मोदी आणि अमित शहा यांचा निर्णय अंतिम असतो, तसा आम्हाला देखील तो अंतिम असेल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र