शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आम्हीच खऱ्या सुगरणी!

By admin | Published: March 08, 2015 2:08 AM

आपल्या आवडत्या व्यक्तीला खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो म्हणतात. त्यामुळे एखादी स्त्री उत्तमोत्तम पदार्थ करून घरच्यांना खूश करीत असेल तर साहजिकच तिला ‘सुगरण’ अशी उपाधी लागते.

आपल्या आवडत्या व्यक्तीला खूश करण्याचा मार्ग पोटातून जातो म्हणतात. त्यामुळे एखादी स्त्री उत्तमोत्तम पदार्थ करून घरच्यांना खूश करीत असेल तर साहजिकच तिला ‘सुगरण’ अशी उपाधी लागते. घरातल्या स्वयंपाकघरात जरी ती अनभिषिक्त सम्राज्ञी असली तरी मोठमोठ्या हॉटेलांच्या किचनमध्ये मात्र पुरुषांचेच राज्य असायचे. आजही छोट्या हॉटेल्सपासून तारांकित हॉटेलमध्ये पुरुष शेफचेच साम्राज्य आहे. चिनू वझे झेवियर्स कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्स घेऊन बी.ए. झालेल्या चिनूला सुरुवातीपासूनच वेगळे काहीतरी करायचे होते. स्वयंपाकाची काही माहिती नसतानाही प्रयोग म्हणून तिने एका रेस्टॉरंटमध्ये तीन महिने काम केले. तिथे खऱ्या अर्थाने स्वयंपाकाची आवड लागली. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी ती फ्रान्सला गेली. जागतिक पदार्थांचा अभ्यास करून परतलेल्या चिनूने स्विस नवरा क्रिस्टोफ पेरिनच्या साथीने गोव्यात ‘गाया’ रेस्टॉरंट सुरू केले. याचवेळी एका वाहिनीवर फिरंगी तडका कार्यक्रमाने तिला सेलिब्रिटी शेफ म्हणून खरी ओळख दिली. तिची पदार्थ दाखवण्याची, तो समजवून सांगण्याची पद्धत भावली. यानंतरही अनेक शोज्मधून कठीण पदार्थ सोप्या पद्धतीने दाखवत त्याविषयीची उत्सुकता वाढवली. मुंबईत ती ‘गाया होम शेफ’च्या माध्यमातून लोकांच्या रसना तृप्त करते आहे.घरातलं स्वयंपाकघर बाईच्या हातात आणि हॉटेलमधले पुरुषांच्या हातात असते, असे का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पूर्वी हॉटेलमध्ये मेहनतीची कामे जास्त असायची, तसेच कामाचेही तास खूप असतात. त्यामुळे मुलींना अशा हॉटेल्समध्ये काम करणे कठीण जायचे. आता मात्र परिस्थिती खूप बदललेली आहे. अनेक मुली या क्षेत्रात येऊन धडपड करीत आहेत. तसेच तंत्रज्ञान वाढल्याने कामाचा भारही हलका झाला आहे. त्यामुळे मुली आता ‘शेफ’ होण्यासाठी प्राधान्य देत आहेत, असे मुंबईच्या हिरानंदानी गार्डन्स येथील मेहुला द फर्न या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफ असलेले परिमल सावंत यांनी सांगितले.महिलांच्या हातात उपजतच स्वयंपाकाची कला तसेच क्रिएटिव्हीटी जास्त असल्याने त्या पेस्ट्री शेफ होण्यास प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत अनेक महिलांनी शेफ म्हणून आपला ठसा उमटवला आहे तर काही प्रयत्नशील आहेत. अशाच काही महिला शेफचा परिचय आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने... आदिती लिमयेजिप्सी आणि नेब्यूला या लोकप्रिय हॉटलचे मालक राहुल लिमये यांची आदिती ही मुलगी. आदितीला घरातल्यांमुळे जरी पदार्थ करण्याची आवड लागली तरी तिलाही स्वत:चे काहीतरी करण्याचा मार्ग खुणावत होता. त्याप्रमाणे सोफिया कॉलेजमध्ये रीतसर प्रशिक्षण घेऊन काही काळ ओबेरॉयसारख्या हॉटेलबरोबर इतरही हॉटेलमध्ये काम केले. दादरसारख्या भागातील लोक फक्त साबुदाण्याची खिचडी खातात हा समज खोटा ठरवत तिने दादरला होम शेफ हे स्वत:चे मल्टीक्युझीन रेस्टॉरंट सुरू केले. त्यानंतर केक, पेस्ट्रीसाठीचे ‘द केक स्टुडियो आणि ‘टूकटूक’ हा स्नेक्स जॉइंटही सुरू केला. तिने आजवर मूळ रेसिपीला थोडा टिष्ट्वस्ट देऊन त्यांना आदिती टच देण्याचा प्रयत्नही यशस्वी ठरला. दादरसारख्या भागात स्वत:चे चौथे ‘ओपन हाउस’ हा कॅफे आणि बार सुरू केला. तिच्या या कामात वडिलांसोबतच सासरे विठ्ठल कामत यांचा सपोर्ट मिळतोय. एकावेळी चार रेस्तरॉं चालवणारी आदिती खवय्यांना वेगळेपण देते आहे. वैष्णवी नलावडे : वरळीतल्या ‘दत्त भुवन’ हॉटेलचे मालक असलेले शंकर नलावडे हे वैष्णवीचे आजोबा. आजोबा आणि वडिलांचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय वैष्णवीने घेतला. पण त्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेत तिने फूड अ‍ॅण्ड बेव्हेगर्समध्ये कौशल्य मिळवले. हॉटेल इंडस्ट्रीचा अनुभव घेण्यासाठी तिने कॉपर चिमणी, पिझ्झा हट, कंसेप्ट फाईन डाईन रेस्टॉरंट अशा विविध ठिकाणी काम केले. त्याचवेळी तिला पॅन एशियन फूड बनवण्याची आवड निर्माण झाली. आजही लोकांची ही गरज ओळखून वैष्णवी आणि तिच्या भावंडांनी वरळीच्या दत्त भुवनच्या जागेवर ‘एण्ड चिलीज’ हे रेस्तरॉं सुरू केले. चायनिज, थाय, मलेशियन पदार्थांत वेगळेपणा देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने अल्पावधीतच माहीमला दुसरे रेस्तरॉं सुरू झाले. यामागे आपण चांगले जेवण बनवू शकतो हा पक्का विश्वास होता. अश्विनी पै हॉटेल इंडस्ट्रीतले ज्येष्ठ शेफ सुधीर पै यांची अश्विनी ही पुतणी. तिला जेवण बनवायला आवडायचं. पण त्यात करिअर करू हे नक्की होत नव्हतं. म्हणून नेहमीच्या धोपटमार्गाने जाण्यासाठी ती मायक्रोबायलॉजी घेऊन ग्रॅज्युएट झाली. त्यानंतर एकदा सुधीर पै यांनाच मदत करण्याची संधी मिळाली. ती मदत करताना आपण चांगले शेफ होऊ शकतो याची जाणीव झाली. मग शेफ होण्याचा निर्णय घेत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्यानंतर मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये किचन मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काही महिने काम केले. त्या काळात विविध शेफच्या हाताखाली काम करताना तिला भरपूर शिकायला मिळाले. सध्या ती डिगास्टीबस हॉस्पिटॅलिटीच्या इंडिगो चेन आॅफ रेस्टॉरंटमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करते आहे. सध्या ज्येष्ठांच्या तालमीत तयार होत असलेल्या अश्विनीला पुढे कॉन्टीनेन्टल पदार्थांमध्ये कौशल्य मिळवत आपले अस्तित्व सिद्ध करायचे आहे. डायना कारवाना डायनाला सुरुवातीपासूनच स्वयंपाकाची आवड होती. त्यामुळे ठरवूनच तिने सोफिया कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट केले. त्यानंतर ताजमहाल हॉटेलमध्ये डायनाने जवळपास ९ वर्षे काम केले. या काळात हॉटेलच्या रेग्युलर किचनमध्ये भरपूर काम केल्यानंतर तिला संधी मिळाली ती ताजच्या सर्वांत लोकप्रिय अशा झोडिएक ग्रिल या फाईन डाइन रेस्टॉरंटमध्ये सेकंड हेड शेफ म्हणून काम करण्याची. त्या वेळी करिना कपूर, सैफ अली खान, सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेकांनी तिच्या पदार्थांची खूप तारिफ केली. ताजमध्ये जगातल्या विशिष्ट व्हीआयपी लोकांसाठी असलेल्या ‘चेंबर्स’ची हेड शेफ म्हणून तिने काम पाहिले. त्या काळात रतन टाटा, मुकेश - अनिल अंबानी, एंजिलिना जोली अशा कित्येक व्हीआयपी सेलिब्रिटींना खिलवण्याची संधी तिला मिळाली. मात्र या सगळ्यात स्वत:चे काहीतरी सुरू करायचे या ऊर्मीने तिने चक्क ताजच्या नोकरीला रामराम ठोकला. गेल्या ६ महिन्यांपासून ‘आवेक लामूर’मधून ती फ्रेंच पेस्ट्री, डेझर्ट, लग्नासाठी-छोट्या पार्टीज्ना लागणारे केक्स तयार करण्याचे काम करते आहे.