शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

'नाणार नाही होणार' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा बदलला सूर, शिवसेना होणार दूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 8:27 PM

नाणारवरुन शिवसेना-भाजपामधील तणाव वाढण्याची शक्यता

राजापूर: आरेवरुन कारे करणाऱ्या आणि नाणारचं जे झालं तेच आरेचंदेखील होईल, असं म्हणत मेट्रोच्या कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं म्हणत होतो, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी उल्लेख न करता शिवसेनेला इशारा दिला आहे. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं रत्नागिरीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारवर भाष्य केलं. 'नाणार रिफायनरी संदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असं घसा फोडून सांगत होतो. मात्र आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतं,' असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान काहींनी 'आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवाय', असा मजूकर लिहिलेले फलक दाखवले. याच फलकांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरीबद्दल पुन्हा चर्चा होऊ शकते, असं विधान केलं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करताना शिवसेनेनं नाणारचा मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेनं नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. त्यामुळेच हा प्रकल्प नाणारमधून रद्द करण्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीआधी आरेतील मेट्रोच्या कारशेडचा मुद्दा तापला आहे. शिवसेनेनं मेट्रो कारशेडविरोधात दंड थोपटले आहेत. नाणारचं जे झालं, तेच आरेचं होणार, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारशेडविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी थेट नाणार प्रकल्पाला गती देण्याचा मानस व्यक्त केल्यानं शिवसेना-भाजपामधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा