जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला. याचवेळी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असतानाचे विज बिल माफीवरील वक्तव्य कार्यकर्त्यांना ऐकवले होते. य़ाला फडणवीसांनी लागलीच व्हि़डिओ आणि नुकताच काढलेला आदेश पोस्ट करून प्रत्यूत्तर दिले आहे.
व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस विजबिल वसुलीविरोधात सरकारविरोधात बोलत होते. मध्य प्रदेश सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये देऊन बिले भरली, महाराष्ट्र सरकार सावकारी पद्धतीने विजबिल वसुली करत आहे. आता करून दाखवा, अशी टीका ठाकरे यांनी फडणवीसांवर केली.
याला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री असतानाचा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईवर बोललेल्याचा आणि आता सत्ता गेल्यानंतर बोललेल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावरून त्यांनी काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
हा पहा तो व्हिडीओ...
जे बोलतो ते करतो...यानंतर फडणवीस यांनी आणखी एक ट्विट करत महावितरणला विजबिल वसुली थांबविण्याचा आदेश पोस्ट केला आहे. यामध्ये कृषी बिलाच्या वसुलीसाठी चालू एका बिलाचा भरणा करून घ्यावा, जास्तीच्या थकबाकी वसुलीसाठी सक्ती करू नये असा आदेश पोस्ट केला आहे. यावर जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे!, असे म्हटले आहे.
हे पहा दुसरे ट्विट...