शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

तुमची लढाई आम्ही लढू

By admin | Published: May 01, 2015 2:44 AM

शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.

खचू नका : संवाद पदयात्रेतून राहुल गांधींचे शेतकऱ्यांना आवाहन गणेश देशमुख - टोंगलाबाद (जि. अमरावती)विदर्भात यापूर्वीही आलोय; पण शेतकऱ्यांची बिकट स्थिती पहिल्यांदाच बघतोय. शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.संवाद पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धामणगाव तालुक्यातील गुंजी, शहापूर, हिरापूर आणि रामगाव या गावांचे राहुल यांनी १२ कि.मी.चे अंतर पायी पार केले. त्यानंतर चांदूर तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या गावांत ते कारने दाखल झाले. राहुल यांच्या या ‘संवाद पदयात्रेला’ रणरणत्या उन्हातही प्रचंड प्रतिसाद लाभला. उत्स्फूर्त स्वागत आणि ग्रामस्थांची गर्दी हे चित्र गावागावांत दिसून येत होते. शेतकरी दु:खाच्या गर्तेत लोटला गेला असताना शासन मदतीला येत नसल्याची भावना शेतकरी कुटुंबीयांनी व्यक्त केली. शेतकरी दु:खात असेल त्यावेळी त्याला मदतीचा हात देणे, उभारी देणे हे शासनाचे कर्तव्यच ठरते. तथापि, केंद्र आणि राज्य शासनाने अशा कठीण समयी वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ न करणे आणि पूर्वी मिळणारी बोनसची सुविधा स्थगित करणे या देशभरातील शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख समस्या असल्याचे राहुल म्हणाले. एकूणच हे शासन शेतकरी, मजूर आणि गोरगरीबांचे नसून भांडवलदारांचेच असल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस अ़ भा़ काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. म्हणून मी आलोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेसतर्फे मदतशेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन कुठल्या क्षमतेत देऊ? असे सांगत सर्वच पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याची क्षमता नसली तरी शक्य ती मदत काँग्रेस पक्षातर्फे केली जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली.विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आज मी किंवा माझा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन तरी कसे देऊ. पण एक सांगतो, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व माझा पक्ष करेल.- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस.महापुरुषांना अभिवादनधामणगाव तालुक्याच्या गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला, हिरापूर येथे गजानन महाराजांच्या व बजरंगबलीच्या मंदिरात आणि शहापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांनी अभिवादन केले. शेतकरी संवादहिरापूरच्या बजरंगबली देवस्थानात राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी सतरंजीवर बसून संवाद साधला. शेतकऱ्यांनी शेतमालाचा भाव, पीक विम्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतीला पाणी आदी मुद्दे जोरकसपणे मांडले. त्यांच्या या मागण्यांकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.