शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

आम्ही दोघे राम

By admin | Published: October 04, 2015 2:05 AM

भाजपाचे दोन राम, अशी आमची एकत्र ओळख जनमनात रुजण्याच्या खूप आधीपासून मी व माझे परममित्र प्रा. राम कापसे परस्परांना ओळखायचो. ते भाषाप्रभू. शांत. संयमी.

विशेष...

- राम नाईकभाजपाचे दोन राम, अशी आमची एकत्र ओळख जनमनात रुजण्याच्या खूप आधीपासून मी व माझे परममित्र प्रा. राम कापसे परस्परांना ओळखायचो. ते भाषाप्रभू. शांत. संयमी. आपल्या स्मित हास्यातून साऱ्यांना मित्र बनविणारे. आपल्या कर्तृत्वातून नवा वस्तुपाठ मांडणारे. त्सुनामीच्या तडाख्यात मोडून पडलेल्या अंदमानला उभं करणारे रामभाऊ नंतर मात्र शारीरिक ताणामुळे खचत गेले. त्यांचे असणे ही माझ्यासारख्या शेकडोंची प्रेरणा होती. कायम असेल...भारतीय जनसंघ महाराष्ट्रात रुजावा, वाढावा यासाठी आपापल्या कर्मभूमीत झटणाऱ्या आम्हा दोघांची जनसंघाची प्रदेश बैठक, अधिवेशन अशा निमित्ताने वर्षातून तीन-चारदा गाठ पडेही. नगरसेवक बनलेले, कल्याण परिसरात शेकापचा प्रभाव असतानाही, पक्ष वाढावा यासाठी पराभव अटळ आहे याची जाणीव असतानाही कृष्णराव धुळपसारख्या धुरंधर नेत्याविरुद्ध निवडणूक लढविणारे कापसे यांच्याबद्दल माझ्या मनात कुतूहल असे. प्रस्थापित शेकापला कल्याणमध्ये आव्हान देणे काँग्रेसलाही शक्य होत नसतानाच्या काळात जनसंघाची पणती लावू पाहाणारे कापसे कोणत्याही कोनातून लढवय्ये दिसायचे नाहीत. सुसंस्कृत, सुशिक्षित मध्यमवर्गीय रामभाऊंचा किंचित मान तिरकी करून खालच्या ओठाला मुरड घालत हसले की डोळ्यांतून डोकावणारा मिश्कील भाव हा समोरच्याला मैत्रीचे आमंत्रण देणारा असे. रामभाऊ आणि माझ्यात स्वभाव सोडून सगळं सारखं (रामभाऊंच्या भाषेत मी ‘गंभीरराव’). त्यामुळेच एकमेकांबद्दल बहुधा एक अनामिक कुतूहल घेऊनच आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात पहिल्यांदा १९७८ साली परस्परांशेजारी बसलो.चाळिशीनंतर आयुष्यात तेही राजकीय आयुष्यात जिवाभावाचा मित्र मिळणार आहे हे त्या वेळी माझ्या गावीही नव्हतं. पण जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शिस्तीत व संस्कारात आम्ही दोघेही वाढलो असल्याने बंधुत्वाचा भाव मात्र आपोआप जागृत झाला होता. समवयस्क रामभाऊंशी मग बघता बघता सूर जुळले. आम्ही दोघंही अभ्यासू. तयारीनिशी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत असू. दोघांच्याही भाषणांकडे साऱ्यांचे लक्ष असे. ते भाषातज्ज्ञ. सरस्वती जणू त्यांच्याकडे पाणी भरे. त्यामुळे त्यांचे भाषण रंजक आणि प्रभावी होई. भाषण सुरू असताना आम्ही एकमेकांचे साहाय्यक बनत असू. शाळेतल्या मुलांची मैत्री एकत्र डबा खाल्यामुळे जशी घट्ट होते तसेच बहुधा आमचे झाले. मी मुंबईच्या पश्चिम उपनगरातून विधानसभा अधिवेशनासाठी येई, तर रामभाऊ कल्याणहून. सर्व उपनगरी मंडळींप्रमाणे आम्हीही सकाळी येताना घरून जेवणाचा पोळी-भाजीचा डबा आणून विधानसभेच्या कँटीनमध्ये एकत्र बसून खात असू. क्वचित प्रसंगी कँटीनमध्ये जेवायचो. विधानभवन आमदार निवासातले जेवण वाईट नसले, तरी जिभेवर चव रेंगाळणारे नक्कीच नसायचे. बहुतेकदा ते अति तिखटही असे. अशावेळी बऱ्याच आमदार, पत्रकारांची कँटीनमध्ये वादावादी होई. एकदा मीही वाढप्यावर संतापलो. त्याचवेळी रामभाऊंनी टेबलाखालून माझा हात दाबला. मी मध्येच थांबल्यावर रामभाऊंनी वाढप्याला मार्गी लावलं. त्यानंतर रामभाऊ म्हणाले, ‘‘तुमचा मुद्दा अगदी बरोबर होता. पण आपल्यापेक्षा छोट्या माणसाशी भांडणे शोभून दिसत नाही. लढायचेच तर आपल्यापेक्षा मोठ्याशी लढावे.’’ आज सर्वत्र माझ्या शांत स्वभावाचे कौतुक होते. मला याबाबतीत परिपूर्ण करण्यामागे रामभाऊंच्या सल्ल्यांचे मोठे योगदान आहे. शेकाप, शिवसेना असे पक्ष भोवताली वरचढ असतानाही रामभाऊ टिकले. एवढेच नव्हे, तर आनंद दिघेंसारखे शिवसेना नेतेही त्यांना मानत. यामागे स्वत: रामभाऊंचा हा स्वभाव होता. अर्थात निग्रहाने शांत राहाण्यात रामभाऊंचा रक्तदाब मात्र उसळे.भाजपाच नव्हे, तर अन्य पक्ष आणि पत्रकारांमध्येही रामभाऊंचे मित्र होते. त्यावरून ते मला हसत म्हणत, ‘‘समाजवादी पत्रकार तुम्हांला ‘अस्पृश्य’ मानतात, मला नाही.’’ गमतीचा भाग सोडला, तरी वास्तव हेच होतं की रामभाऊ कापसे सर्वप्रिय होते. रामभाऊंच्या ठाणे मतदारसंघाप्रमाणे ज्यांचा मतदारसंघ मोठा त्यांना वाहनाची गरज मोठी असे. त्यात तेव्हा दळण-वळणाची साधनेही सहज उपलब्ध नसत. रात्री-बेरात्री लोकांनी हाक मारली की रामभाऊ धावायचे. पण स्वत:चं वाहन नसताना हे करताना रामभाऊंची प्रचंड ओढाताण होई. मग आजच्या राजकीय परिस्थितीत अविश्वसनीय असे घडले. रामभाऊंच्या कल्याणमधील काही मित्रांनी चक्क आपसात वर्गणी काढून त्यांना ‘फियाट’ घेऊन दिली. गाडी मिळाली पण ती चालवणार कोण? मग विधिमंडळात आमच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका होतकरू मुलाला - प्रसन्न कुडतरकरला रामभाऊंनी अगोदर कार्यालयीन मदतीला आपल्याकडे घेतलेच होते. त्यालाच गाडी शिकायला सांगितली. साधा मदतनीस म्हणून गेलेल्या मुलाला रामभाऊंनी कामात खूप तरबेज केले. रामभाऊ अमूर्तावस्थेतील सिडकोचेही अध्यक्ष होते. सिडकोच्या नियोजनात त्यांचा मोठा वाटा आहे. सलग तीनदा आमदार म्हणून एकत्र काम करणारे आम्ही एकदमच १९८९मध्ये खासदारही बनलो आणि या आमच्या स्नेहाचा खरा मोरावळा बनला.कृतीतून प्रेम दाखविण्यात रामभाऊ यत्किंचितही उणे पडले नाहीत. १९९४मध्ये मला कर्करोग झाला असल्याची शक्यता संसदेतल्या डॉक्टरांनी वर्तवून मुंबईलाच पुढील तपासासाठी जायला सांगितलं. तसा मी निघालोही. माझ्या घरचं कोणीच तेव्हा दिल्लीत नव्हतं. एकटाच निघालो. तर रामभाऊ दारात हजर झाले. माझ्याच विमानाचं तिकीट काढून माझ्यासोबत आले. मला घरच्यांकडे सोपवून मगच ते कल्याणला घरी गेले. आमच्या दोघांच्याही पत्नी नोकरी करणाऱ्या. त्यामुळे आम्ही दोघे दिल्लीत एकटेच असायचो. एकत्र येऊन मग आम्ही संसदेत प्रभावी काम करण्यासाठी विविध मुद्दे काढायचो. कोणते विविध वैधानिक मार्ग अवलंबून प्रश्न सोडवता येतील याचा तासन्तास अभ्यास करायचो. मुंबईची उपनगरी रेल्वे आम्हा दोघांचाही जिव्हाळ्याचा विषय. त्यावर तर आम्ही इतके एकत्र काम केले की सगळे आम्हांला म्हणायचे, भाजपाचे राज्य आले की मोठी पंचाईत होणार. दोन रामांपैकी कोणाला रेल्वे खातं द्यायचं असा अटलजींना प्रश्न पडेल. पण राजकारणात सगळं इतकं सरळ आणि सोप्प नसतं. एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रातून रामभाऊ सलग तीनदा आमदार म्हणून निवडून आले. रामभाऊ म्हाळगींचे शिष्य असणारे राम कापसे गुरूला अभिमान वाटेल असे आदर्श जनप्रतिनिधी झाले. सलग दोनदा खासदार म्हणूनही निवडून आले. रामभाऊंचा ठाणे मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला बनला. परंतु युतीच्या राजकारणात एक तडजोड म्हणून रामभाऊंचा मतदारसंघ १९९६मध्ये शिवसेनेला दिला गेला. रामभाऊ रागावले असते, चिडले असते, तर समजण्यासारखं होतं. पण रामभाऊंनी आपल्या ओठांना घट्ट शिवण घातली. पुढे त्यांना राज्यसभेवर घेतले गेले, तेही बाकीच्यांनाच त्यांची उणीव जाचत होती म्हणून. १९९८मध्ये मला जेव्हा रेल्वे राज्यमंत्री पद दिले गेले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. खोटं कशाला बोला मीही थोडासा खट्टू झालो होतो. रामभाऊंचा मित्र असल्याने उघड काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पण रामभाऊंना मात्र मी फोन लावला. मी काही बोलण्याआधी ते उत्साहाने म्हणाले, ‘‘वा! मस्त झालं! काही जण म्हणतील तुम्हाला कॅबिनेट मिळायला हवं होतं. तरी तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. आवडीचं खातं दिलंय. राज्यमंत्री म्हणूनही सोनं करू शकाल. मी हवी ती मदत करेन. आपण रेल्वेसाठी किती स्वप्नं पाहिली. ती खरी करून दाखवा!’’ मनावर येऊ घातलेली काजळी रामभाऊंच्या दोन वाक्यांत नष्ट झाली. रामभाऊंच्या संयमाची सतत परीक्षा पाहिली गेली. प्रत्येक वेळी ते उत्तीर्ण झाले. पुढे रामभाऊ अंदमानचे राज्यपाल झाले. सेल्युलर जेलसमोर प्रस्तावित केलेली स्वातंत्र्य ज्योत नीट बनते आहे का याकडे ते जातीने लक्ष देत. काम पूर्ण झाले परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याचे उद्घाटन होऊ शकले नाही. २००४ची निवडणूक मी हरलो परंतु उद्घाटनप्रसंगी मलाही बोलवायचा त्यांनी डॉ. मनमोहन सिंगांच्या सरकारकडे आग्रह धरला. प्रत्यक्षात उद्घाटनाच्या वेळी तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांनी त्यावरील सावरकरांच्या काव्यपंक्ती काढल्याने देशभर रण माजले. अशावेळी रामभाऊंचा कमी संताप झाला नव्हता. परंतु घटनेने दिलेल्या पदाचा योग्य आदर राखण्यासाठी त्यांना याविषयी पूर्ण मौन बाळगणे भाग होते. आता नव्याने सावरकरांच्या काव्यपंक्तींसह तिथे दुसरी ज्योत होते आहे. पण कोणीही कितीही आग्रहाने आमंत्रण दिलं तरी येता येणार नाही अशा मुक्कामी रामभाऊ गेले आहेत. पण प्रत्येक अंदमान - निकोबारवासीयांच्या मनात प्रा. राम कापसे आजही जिवंत आहेत. रामभाऊ राज्यपाल असतानाच अंदमानवर त्सुनामीच्या संकटाचं आभाळ कोसळलं. रामभाऊ संपूर्ण अंदमान जणू त्यांचा संसार आहे असं समजत. कुसुमाग्रजांची कविता ‘‘मोडला नाही कणा, तुम्ही फक्त लढ म्हणा’’ व्यापक अर्थाने जगले. संपूर्ण राज्य त्यांनी पुन्हा उभं केलं. उजाड राज्यातील नगरवासीयांचे अश्रू पुसायला तत्काळ धावले. अंदमानसाठी मदत गोळा करायला देशभर हिंडले. उभारणीच्या वेळी दिवस-रात्र स्वत: उभे राहिले. एरवी मागे राहाणाऱ्या स्मिता वहिनी सहकुटुंब सतत त्यांच्याबरोबरीने झटल्या. या साऱ्या ताणाचा रामभाऊंच्या शरीरावर नको एवढा दुष्परिणाम झाला. अंदमान पुन्हा उभे राहिले; पण ते उभे करताना स्वत: रामभाऊ असे अंथरुणावर खिळले की पुन्हा उभे राहू शकले नाहीत. तरीही त्यांचे असणे ही माझ्यासारख्या शेकडोंची प्रेरणा होती. मी स्वत: राज्यपाल झाल्यावर कल्याणला जाऊन रामभाऊंना भेटलो होतो. त्या वेळी त्यांच्याशी गप्पा मारल्या पण त्यांनी पूर्वीप्रमाणे एकदाही माझी चेष्टा केली नाही. तेव्हाच मनात पाल चुकचुकली. आणि आता तर प्रत्यक्ष विधात्यानेच आम्हां दोन रामांचे अद्वैत संपविले. ...आणि रामभाऊंनी तारलेआमदारकीच्या काळात माझ्यावर विधानसभेत एकदाच मोठा बाका प्रसंग उद्भवला. त्या वेळीही मला तारले कापसे यांनीच. एकदा मी ‘‘सभागृह म्हणजे जणू मूर्खांचे नंदनवन झाले आहे,’’ असे बोललो. झालं! सभागृहात गदारोळ सुरू झाला. सारेच माझ्यावर तावातावाने उलटू लागले. अध्यक्षस्थानी असलेले (कै.) शरद दिघेही एकूण वातावरणाने अचंबितच झाले होते. भाजपा गटाचे नेते म्हणून त्या वेळी कापसे बोलायला उभे राहिले. ‘‘राम नाईक यांनी कोणाची अवमानना केलेली नाही. मूर्खांचे नंदनवन हे रूपक आहे. ते कोणालाही मूर्ख म्हणालेले नाहीत. त्यांनी सभासदांना मूर्ख अशी उपमा दिलेली नाही. मूर्खांचे नंदनवन ही एक कल्पना आहे. जिचा राम नाईक यांनी रूपक म्हणून वापर केला आहे. इथे उत्प्रेक्षा......’’ रामभाऊ असं सलग ३-४ मिनिटं बोलत होते. हळूहळू सभागृह शांत होत होतं. अखेर अध्यक्ष (कै.) दिघे म्हणाले, ‘‘कापसे! अहो व्याकरणाचा तास नका घेऊ. राम नाईक काहीही चुकीचे बोलले नाहीत हे मान्य; पण आता व्याकरण नका हो शिकवू!’’ त्या बाका प्रसंगातून मी सहीसलामत सुटलो ते कापसेंमुळेच!