शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"आम्हाला भीती नाही"; सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 8:09 PM

कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला.

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर आले. सरकारविरोधात विरोधकांकडून अधिवेशनात ५० खोके, एकदम ओक्के अशाप्रकारे घोषणाबाजी दिली जाते. परंतु आज विधानसभेत वार्ड रचनेच्या विधेयकावर चर्चेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, सभागृहात जो युक्तिवाद चाललाय तो कोर्टातही सुरु आहे. मी यावर भाष्य करणार नाही. परंतु आज एवढी घाई का आहे? जणू उद्याच निवडणुका लागल्या आहेत. काही जणांना निवडणुकांची भीती वाटते हे माहित्येय. सर्वकाही आपल्याला घटनाबाह्य करायचं का? हे सरकार घटनाबाह्य आहे. सुप्रीम कोर्टाचा सातत्याने अपमान करायचा असा आरोप त्यांनी केला. 

तर काही जण म्हणतात घटनेविरोधात सरकार स्थापन केलंय. दररोज सकाळी ९.३० वाजता सुप्रीम कोर्टात अर्ज द्यायला जायचे. हे थांबवा, ते थांबवा काय झालं? आम्ही बहुमताच्या नियमानुसार काम करतोय. या देशात घटना, नियम आहे. त्याविरोधात आम्ही गेलो नाही. त्याविरोधात आम्ही गेलो नाही. कधी जाणार नाही. कारण आमच्याकडे भक्कम बहुमत आहे आणि ते वाढत चालले आहे. त्यामुळे कुठलीही भीती आम्हाला नाही. कशाला आम्ही घाबरू असा प्रतिसवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना केला. दरम्यान, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे घटनेनुसार चालतं. आम्ही घटनाबाह्य काही केले नाही त्यामुळे सगळ्यांची अडचण झालीय. त्यामुळे वार्ड रचनेचे हे विधेयक लोकांच्या फायद्याचे आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

वार्ड रचनेबाबत होणार चौकशीमुंबई महापालिकेतील वार्ड रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. त्याचसोबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही पालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून कालबद्ध चौकशी करू अशी घोषणा करत एकप्रकारे सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली. विधानसभेत वार्ड रचनेवर विधेयक मांडण्यात आले. त्यावर चर्चा करताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यावर अनेक आरोप केले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देत दर १० वर्षांनी जनगणना होते. त्यानुसार वार्ड वाढवले जातात. २० टक्क्यांच्या लोकसंख्येला ६ वार्ड वाढवले आणि ३.८ टक्के लोकसंख्या असताना ९ वार्ड वाढवले. ही विसंगती आहे. याबाबत ८९२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAaditya Thackerayआदित्य ठाकरे