शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास करायला हवा

By admin | Published: June 27, 2016 1:07 AM

धर्म हा तर्कसुसंगत असला तरच पुढील पिढी तो योग्यप्रकारे जाणून घेऊ शकेल.

पुणे : धर्म हा तर्कसुसंगत असला तरच पुढील पिढी तो योग्यप्रकारे जाणून घेऊ शकेल. व्यापार म्हणून सुरू असलेली धर्मस्थळे अंधश्रद्धा पसरवितात. त्यामुळे तर्कशुद्ध पद्धतीने धर्माचा विचार करून चमत्काराशिवाय प्रत्येकाला धर्म जगता आला पाहिजे. धर्मस्थळांनी धर्म समजावून सांगणारी संस्कार केंद्र सुरू केली तर या केंद्रातून धर्माचा तर्कशुद्ध अभ्यास केला जाईल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या ११९व्या वर्धापनदिनानिमित्त लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार माहेर संस्थेच्या ल्युसी कुरियन, संशोधक मनीषा दाते आणि ममता फाउंडेशनच्या शिल्पा बुडुख यांना रविवारी प्रदान करण्यात आला. महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला.अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, बाळासाहेब दाभेकर, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. डी. पाटील, कार्याध्यक्ष युवराज गाडवे, उत्सवप्रमुख अंकुश काकडे, खजिनदार बी. एम. गायकवाड उपस्थित होते. समाज आत्ममग्न झाला आहे. आपण आजूबाजूचे जग पाहिले तर बरेच प्रश्न व समस्या दिसतील. आपण एकत्रित येऊन काम केले तर हे प्रश्न नक्कीच सुटतील. समाजकार्यात आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या घरापासून केली पाहिजे.- मृणाल कुलकर्णी एखादी व्यक्ती घडत असते, तेव्हा लहानपणापासून त्या व्यक्तीवर चांगल्या गोष्टींचे संस्कार घडतात. आई-वडील, शिक्षक, मित्र-मैत्रिणी व आजूबाजूच्या वातावरणातून ती व्यक्ती घडते. समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींकडून सामाजिक समतोल राखण्याचे काम सुरू असून आपणही हातभार लावायला हवा.- माधुरी मिसाळ, आमदार