पुणे : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये भगवान राम यांना परमपूज्य मानले आहे. तसेच आपल्या संस्कृतीतील आदर्श पुरुष म्हणून त्यांना मान्यता आहे. त्यातही केवळ मंदिर बांधण्याचा मुद्दा नाही ; तर आदर्शांची स्थापना केली तर त्यानुसार पुढील पिढीपर्यंत आदर्श विचार पोहचतात. त्यामुळे भगवान राम यांच्या कर्मभूमीवर स्मारक झाले पाहिजे,’’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेमध्ये ‘संस्कृती व संविधानातून राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावरील सत्रात भागवत बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर , एमआयटीएचे संस्थपाक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्रा. राहूल कराड आदी उपस्थित होते. यावेळी झालेली प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे -भारतीय छात्र संसदमाईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘संस्कृती व संविधानातून राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भागवतांनी विचार मांडले.प्रश्न - राम मंदिर बांधल्यामुळे गरीबाच्या ताटात भाकरी येणार आहे का? भागवत - सध्या राम मंदिर बांधले गेले नाही म्हणून काय गरीबाच्या ताटात भाकरी आली आहे का? केवळ मंदिर बांधण्याचा प्रश्न नाही तर त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारलेच पाहिजे.प्रश्न - आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटते?भागवत - समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण असले पाहिजे. मात्र,आरक्षणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे.प्रश्न - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे काहींनी देश सोडून जाण्याचे वक्तव्य केले होते, त्याबद्दल तुमचे मत काय आहे? भागवत - स्वार्थी भूमिकेतून भावूकतेने केलेल्या वक्तव्यावर माझा विश्वास नाही. सहिष्णूता संस्कृतीचा आत्मा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहन वआदर करण्याची भावना असावी. राजकीय व्यक्तींसह इतरांनीही समाज भडकविणारी वक्तव्य केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
राम मंदिर बांधायला हवे
By admin | Published: January 29, 2016 1:51 AM