लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपल्या मतदारसंघात उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून देण्याच्या योग्यतेचा नाही असे वाटल्यास मतदारांसाठी नोटाचा पर्याय आहे. लोकसभा असो की विधानसभा निवडणूक काही वर्षांपासून नोटा अर्थात (नन ऑफ द अबोव्ह) या पर्यायाचा वापर वाढला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. लातूर ग्रामीण आणि सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव येथे नोटाचा पर्याय दुसऱ्या स्थानी होता. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. लातूर ग्रामीण आणि सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव येथे नोटाचा पर्याय दुसऱ्या स्थानी होता.
या मतदारसंघात नोटास सर्वाधिक मते
- लातूर ग्रामीण २७,५००
- पलूस-कडेगाव २०,६३१
- पनवेल १२,३९९
- जोगेश्वरी पूर्व १२,०३१
- बोरिवली १०,०९५
- विक्रमगड ८४९५
- पालघर ७१३५
- मुरबाड ६७८३
- वरळी ६३०५
- कल्याण ग्रामीण ६०९२
नोटाला कमी मते कुठे मिळाली?
- नेवासा ३१६
- गेवराई ४७८
- परळी ५६१
- कराड दक्षिण ५८४
- पंढरपूर ६३९
- हदगाव ६८२
- सांगोला ७००
- लातूर शहर ७२७
- इंदापूर ७३१
- माजलगाव ७८०