राजकारणात मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले, असे माझे मार्गदर्शक आणि नेते म्हणून कुणी होते, तर ते गोपिनाथ मुंडे होते. याचा मला अभिमान आहे, असे म्हणत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत काम करतानाच्या काही आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसाठी आलेल्या रिलायन्सच्या टेंडरसंदर्भातील एक किस्सा सांगितला. गडकरी मला म्हणाले, या टेंडरसंदर्भात जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते मला म्हणाले, मी तुझ्या मागे ऊभा आहे. काळजी करू नको आणि आम्ही एवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं अन् 3600 कोटी रुपयांचं काम फक्त 1600 कोटीत पूर्ण केलं. म्हणजे आजच्या काळातले 20 हजार कोटी रुपये वाचले, असे गडकरी म्हणाले. ते सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते. गडकरी म्हणाले, जेव्हा महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतूचं सरकार आलं, मंत्रीमंडळात माझा प्रवेश झाला, त्यावेळी मी मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री झालो होतो. तेव्हा मंडे साहेबांनी मला बोलावलं आणि विचारलं की, आपल्याकडे दोन खाती आहेत. एक उर्जा खातं आणि एक बांधकाम खातं. तुला काय हवं? मी म्हणालो तुम्ही द्याल ते खातं मी घेईन. त्यावेळी एनरॉनची चर्चा सुरू होती. ते मला म्हणाले, सध्या एनरॉनमुळे बरेच वाद विवाद वाढले आहेत. या ठिकाणी हे अडचणीचं आहे. तू बांधकाम खातं घे, मी उर्जा माझ्याकडे ठेवतो. मी म्हणालो, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यांनी मला बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी दिली. मुख्यंमंत्री शिवसेनेचे होते आणि उपमुख्यंमंत्री भाजपचे होते.
यानंतर त्यांचे सर्वात मोठे समर्थन मिळाले. ज्यावेळी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेसाठी रिलायन्सचं 3600 कोटी रुपयांचं टेंडर आलं होते. मी गोपिनाथ मुंडेंकडे गोले आणि त्यांना म्हणालो, हे टेंडर फार जास्त आहे. हे दिलं तर आपल्यावर टीका होईल. त्यामुळे आपण हे टेंडर रिजेक्ट करून, नवीन टेंडर काढायला हवं, असं मला वाटतं. त्यांनी माझ्याकडची सर्व कागदपत्रे तपासली आणि सांगितलं की मी तुझ्या मागे ऊभा आहे. काळजी करू नको आणि आम्ही एवढं मोठं ते टेंडर रिजेक्ट केलं आणि ३६ शे कोटी रुपयांचे काम केवळ १६ शे कोटीत पूर्ण केलं. म्हणजे आजच्या काळातले 20 हजार कोटी रुपये वाचले, असेही गडकरी म्हणाले.
"नितून तू आता मला खाली वाकून नमस्कार कशाला करतोय?" - "मी जेव्हा भरतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालो, तेव्हा इंदूरमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला. त्या व्यासपीठावर अनेक मोठ-मोठे नेते बसले होते. मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, खाली वाकून पाया पडून केवळ दोनच व्यक्तींना नमस्कार केला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की, नितून तू आता मला खाली वाकून नमस्कार कशाला करतोय? तू आता अध्यक्ष झाला. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली. त्यामुळे तूम्ही आणि मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात," असा प्रसंगही गडकरी यांनी यावेळी सांगितला.