मुंबईः बाळासाहेबांची विचारधारा आणि कामाची पद्धत भाजपाच्या विचारांशी सुसंगत होती, असं मला कधीच वाटलं नाही. बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपाच्या लोकांच्या कामाच्या पद्धतीत जमीन आस्मानचा फरक आहे, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले आहेत.(Sharad Pawar Sanjay Raut Interview) संजय राऊतांनी सामनासाठी घेतलेल्या खास मुलाखत ते बोलत होते. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींचा केला. त्यांनी अडवाणींचा केला. त्यांनी प्रमोद महाजन यांचा केला. या सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन एकत्र येण्याचा विचाराला त्यांनी हातभार लावला, दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता. पण तो संघर्ष कायमचा होता, असं मला वाटत नाही.सेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती, असं वाटत नाही. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या देशातील एकमेव संघटना अशी असेल, की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भविष्याची काही स्थिती यत्किंचीत तमा न बाळगता पाठिंबा द्यायचा. ते शिवसेनेच्या नेत्यांनीच केलं. ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या विरोधात अख्खा देश होता, त्यावेळी शिस्त आणणारं नेतृत्व म्हणून त्याच्याबरोबर बाळासाहेब उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाही, तर आम्हाला लोकांना त्यावेळी धक्काच बसला. तेव्हा बाळासाहेबांनी भूमिका घेतली की महाराष्ट्राच्या निवडणुकीला उमेदवारसुद्धा उभा करणार नाही, असंही पवारांनी सांगितलं आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)
गेली पाच वर्षं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायच्या आधी सेना आणि भाजपाचं सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा मतदार आणि सेनेचा कार्यकर्ता यांच्यात सरकारबद्दल अस्वस्थता होती. सेनेची काम करण्याची पद्धत ठोसपणानं गोष्ट राबवायची होती. भाजपाने त्यांना गप्प बसवण्याचा, बाजूला ठेवण्याची भूमिका सातत्यानं घेतली. महाराष्ट्रातल्या जनतेने जी पाच वर्षं पाहिली, ती भाजपाचं सरकार असल्याचीच होती. याच्याआधी असं नव्हतं. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली युती सरकार होतं. नेतृत्व शिवसेनेकडे होते. बाळासाहेबांची भक्कम भूमिका होती. मागच्या पाच वर्षांत सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजपा म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या काळात भाजपाच्या विचारानेच चालणार ही भूमिका घेऊन पावलं टाकली. ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नव्हती. दुसरं कुणी राजकारण करू शकत नाही, असं वाटत होतं, असं म्हणत पवारांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.
मी येणार, मी येणार आणि मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहित धरायचं नसतं. मीच येणार ही भूमिका घेऊन मतदाराला गृहित धरलं तर तो सहन करत नाही. त्यात थोडासा दर्प आहे आणि धडा शिकवला पाहिजे, असं जनतेनं ठरवलं. कुठल्याही लोकशाहीतला नेता अमरपट्टा घेऊन आलोय, असा विचार करूच शकत नाही. इंदिरा गांधींनाही पराभव पाहावा लागला, अटलबिहारी वाजपेयींनाही पराभव पाहावा लागला. राजकारणातल्या लोकांपेक्षा मतदार शहाणा आहे. चाकोरीच्या बाहेर पाऊल टाकतोय असं दिसलं तर तो धडा शिकवतो, असंही पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा
भाजपाने सत्ता कशामुळे गमावली?; शरद पवारांनी 'मी पुन्हा येईन'ची गोष्ट सांगितली
'हा' आहे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमधला महत्त्वाचा फरक; शरद पवारांचं निरीक्षण
"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली": शरद पवार
लॉकडाऊनवरून उद्धव ठाकरेंशी मतभेद?; शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत
कोरोनाबरोबर जगायची तयारी असावी; तो दैनंदिन जीवनाचाच एक भाग- शरद पवार
CoronaVirus: मुंबईतल्या धारावी मॉडेलची जगभरातून प्रशंसा; जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं कौतुक