नागपूर - ओबीसी समाजात भीती आहे की आमचे आरक्षण कमी होणार, मात्र असा गैरसमज करून घेऊ नये. काहीही झाले तरी सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात सोमवारी म्हणाले.
म्हणाले, आजच्या मुंबईतील बैठकीत सर्वानुमते पुढे जाण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानिमित्त मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहेत. त्यांच्या मागण्या आहे. इतरही समाजाच्या मागण्या आहेत. प्रश्न सोडवायचा असेच तर कायद्याच्या चौकटीत टिकलेही पाहिजे. अन्यथा समाज म्हणेल आमची फसवणूक केलीय. त्यामुळे सर्वांनी मिळून यावर काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला जाईल.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे नांदेडमध्ये शेकडो वाहने खोळंबलीनांदेड : मराठा आरक्षणासाठी नांदेड- आरोग्यमंत्र्यांसमोर हैदराबाद राज्य महामार्गावर मारतळा व कौठा फाटा (ता. लोहा) येथे सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली.गडगा नरसी रस्त्यावर खंडगाव फाटा येथे आंदोलकांनी रस्त्यावर लाकडे टाकत टायर जाळून सरकारचा निषेध केला. कंधार, अर्धापूर तालुक्यातीनल धामदरी व देगाव कु. तसेच किनवट येथेही आंदोलकांनी उपोषण सुरू केले आहे..
- धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणांनी उपोषण सुरु केले आहे.|- आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या पालकमंत्री तानाजी सावंत यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.- ढोकी लातूर- बार्शी मार्गावर तसेच कळंबजवळ डिकसळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आरक्षण देण्याची सरकारची स्पष्ट भूमिका आहे, जे आरक्षण देऊ ते फुलप्रूफ व टिकणारे असणार आहे, थातूरमातूर, तात्पुरते काम करून उपयोग नाही. जे करू ते पूर्णपणे कायदेशीर असेल त्यासाठी विरोधी पक्षांनीही सहकार्य करावे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
उपोषण सुरुच छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या देविदास पाठे यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाही पाणीही न पिण्याची भूमिका पाठे यांनी घेतली आहे.