मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 09:26 AM2020-03-04T09:26:02+5:302020-03-04T09:27:06+5:30

केंद्र सरकारने आधीच सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यात मुस्लीम येतातच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. तसेच मुस्लीम कोट्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची साथ सोडली तरी शिवसेनेने चिंता करू नये, आम्ही साथ द्यायला तयार आहोत, असं मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

We will support Shiv Sena if NCP-Congress gets out for Muslim reservation: BJP | मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

मुस्लीम आरक्षणावरून राष्ट्रवादी-काँग्रेस बाहेर पडल्यास शिवसेनेला आम्ही साथ देऊ : भाजप

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुस्लीम आरक्षणासाठी सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी देऊन शिवसेनेवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेनेला साथ देऊ असं भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. यावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी म्हटले की, मुस्लीम आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव अद्याप आपल्यापर्यंत आलेला नाही. जेव्हा येईल त्यावेळी त्याची वैधता तपासून निर्णय घेण्यात येईल. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार असल्याची घोषणा केली होती. यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे दिसून आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्यात येऊ नये. मुस्लीम आरक्षणासंदर्भात शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्य आहे. ते संविधानानुसार बोलत आहेत. संविधानात धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं कुठही सांगण्यात आलेलं नाही. धर्माच्या आधारेच आरक्षण द्यायचे झाले तर शिखांनी काय चूक केली, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने आधीच सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्यात मुस्लीम येतातच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. तसेच मुस्लीम कोट्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची साथ सोडली तरी शिवसेनेने चिंता करू नये, आम्ही साथ द्यायला तयार आहोत, असं मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 
 
Web Title: We will support Shiv Sena if NCP-Congress gets out for Muslim reservation: BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.